परतूर शहरात महात्मा फुले व भारतरत्न , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमर हजारे यांचे जाहीर व्याख्यान ...


परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे
उपेक्षितांचे जीवनमान उंचावण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य व मार्गदर्शक आणि प्रेरक ठरतात 
    आधुनिक युगातही त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा दिवसेंदिवस वाढत असून महापुरुषांच्या विचाराचे पाठबळ पाठीशी असल्यास वेगळ्या क्षेत्रात काम करताना कोणत्याही प्रसंगाला सहजतेने सामोरे जाता येईल म्हणून आजच्या तरुण पिढीला या व्याख्यान मालेची नितांत गरज आहे म्हणून परतूर शहरात क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त परतूर शहरात बीड येथील सामाजिक चळवळीतील काम करणारे युवा वक्ते अमर हजारे यांचे दिनांक 13/4/2022 वार बुधवार रोजी जाहीर व्याख्यान ठेवण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाला परतूर परिसरातील बंधू-भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान दीपक मुजमुले व सिद्धार्थ बँड यांनी केले आहे.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात