सुदामा गरीब असू शकतो माञ तो कदापीही दारीद्री होऊ शकत नाही - हभप मनमोहन महाराज गिरी

तळणी (रवि पाटील) येथून जवळच असलेल्या ऊस्वद येथे अंखड हरीनाम सप्ताहच्या निमीत्याने श्रीमद संगीत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते ह भ प मनमोहन महाराज गीरी आंळंदी याच्या, सुमधुर वाणीतून पंचक्रोशीतील भावीकांनी मोठा लाभ घेतला पूर्णा नदीच्या तीरावर असलेल्या व्यकेश्वर मंदीराच्या प्रागणात या कथेचे आयोजन ऊस्वद ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले होते कथा समारोप प्रसंगी महाराजानी श्रीकृष्ण आणि सुदामा याच्या जीवनचरिञावर प्रकाश टाकला 

अनेक कथाकार सुदामाला दारीद्री संबोधतात पण सुदामा कधीच दारीद्री नव्हते जगाच्या मालकाचा सखा कसा काय दारीद्री असू शकतो भगवान कृष्णा वर असलेली श्रध्दा व विश्वासामुळे सुदाम देवानी कठीणातल्या कठीण प्रसंगाला सुध्दा सामोरे गेले भगवान श्रीकृष्णाचा प्राणप्रिय सखा सुदामा गरीब असू शकतो माञ तो कदापीही दारीद्री होऊ शकत नाही सुदाम देवा जवळ स्वःतचे कुठलेही ऐश्वर्य नसले तरी दान देण्याची प्रवृत्ती माञ आताच्या समाजाला आदर्श घेण्यासारखी आहे 

अनेक दीवसाच्या भेटीने भगवतांला सुध्दा आपल्या आयुष्यातील मिञाच्या भेटीचा विरह सतत ञासदायकच जाणवत होता प्रत्यक्ष्य भेटीत भगवंताने मनमूराद पणे या ब्राम्हण मित्राचा यथोचित सन्मान करुन मित्रत्वाचे कर्तव्य काय असते याचे ऊत्तम उदाहरण म्हणजे कृष्ण सुदामाची मैञी आजच्या मैञीतील नात्यामध्ये कर्तव्याला आपण मिञ म्हणून कीती न्याय देतो हे ज्याचे त्याने तपासने गरजेचे आहे आजच्या युगात मनुष्याकडे कीतीही सपंती असली तरी तो समाधानी नाही त्याला समाधानाच्य सुखाची प्राप्ती करायची असेल तर त्याने भागवत कथेचे श्रवण करावे सध्याच्या या धकाधकीच्या वातावरणात तुम्हाला आम्हाला भक्ती मार्गच तारू शकतो त्याला नामस्मरणाणाची जोड देणे आवश्यक आहे फक्त सप्ताह आला की आपला भक्तीचा मळा फुलत असतो अशा भक्तीला कुठेही जागा नाही रोजच्या भोजनामध्ये व सांसारीक गरजेच्या गोष्टी मध्ये मनुष्य जसे सात्तत्य ठेवतो तसेच सातत्य आपल्या भक्ती साधनेत असणे गरजेचे आहे तेव्हाच ती फलप्राप्ती देते 

सध्याच्या तरुण पीढीत व्यसनाधीनतचे प्रमाण मोठे वाढले आहेत संस्कार नावाच्या गोष्टीला तीलांजंली देण्यात येत आहे आपल्या मुलांना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाका कमीत कमी तो मुलगा आई वडीलांना वृध्दाश्रमात तरी पाठवणार नाही व्यसनाच्या आहारी जाणार नाही आज धर्मावर विविध प्रकारचे आघाते होत आहे त्यासाठी सगळ्यानी एकाच झेडया खाली येऊन संघटीत होऊन अशा अधर्मी प्रवृतीचा प्रतिकार करणे सध्या गरजेचे आहे मनुष्याने मिळेल तेव्हा नामस्मरणात वेळ घालवला पाहीजे मनुष्याचा पूण्य संच याचा आलेख हा सतत वाढला पाहीजे तरच मनुष्य जन्माचे सार्थक झाल्या शिवाय राहणार नाही

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.