कर्जबाजारी युवक शेतकऱ्यांची गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा


परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे

परतूर येथील युवक शेतकरी दिनकर हरिभाऊ मुजमुले वय 35 वर्षे याने गुरुवार ता.14 रोजी रात्री 7: 30 च्या सुमारास स्वतःच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे 
घटनेची माहिती मिळताच घटस्थापस्थळी पोलीस शिपाई श्री. अशोक गाढवे,श्यामुअल गायकवाड, श्री कोकाटे यांनी भेट देत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले .उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईक स्वाधीन करण्यात आला.
सतत शेतीपिकाचे होणारे नुकसान,नापिकता यामुळे हे पाऊल उचले असल्याचे बोलले जात आहे
        भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पाच लाखाच्या वर कर्ज असल्याचे समजते याचबरोबर काही खाजगी सावकाराचे पण कर्ज होते. खाजगी सावकाराने तगादा लावल्याने हे पाऊल त्यांनी उचले आसाअंदाज व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, पत्नी आई असं  परिवार आहे.
घटनेची नोंद पोलीस ठाण्यात देण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार हे करीत असल्याची माहिती श्री अशोक गाढवे यांनी दिली.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले