सुमित भंडारी व संतोष काळे यांच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न


परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे

पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुमित भंडारी व संतोष काळे,सय्यद तय्यब यांच्याकडून उपवास धारकांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मोंढा भागातील तय्यब मोबाईल शॉपच्या आवारात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते 
यावेळी शहरातील उपवास धारक, व्यापारी वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती 
यावेळी सुमित भंडारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की देशामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी हिंदू-मुस्लिम समाजाने एकोपा जपला पाहिजे आणि सर्वधर्मीय सण उत्सव मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन साजरे केले पाहिजे
यावेळी माजी नगरसेवक आबासाहेब कदम,शिवसेना शहराध्यक्ष दत्ता सुरुंग,राहुल कदम,सचिन खैरे,अंकुश काष्टे,पांडुरंग सोळंके,अविनाश कुलकर्णी, मदन सोळंके,हबीब शेख,जुबेर खतीब,राजेश गोरे,राहुल काळे,शत्रूधन सोळंके,सुरेश नवगिरे,नसीर शेख,शेख अकबर,शेख अथर,सचिन धुमाळ,भारत धुमाळ,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.