पारडगाव येथील आठवडी बाजारातील अतिक्रमण हटवा...रा. काँ. नेते शिवाजी भालेकर यांची मागणी.
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
घनसांगी तालुक्यातील पारडगाव येथील आठवडी बाजारात पार डगाव येथील काही विघ्नसंतोषी लोकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून त्यामुळे पारडगाव येथे येणाऱ्या व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने येथील आठवडी बाजारातील अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी पार डगाव येथील रा. काँ. नेते शिवाजीराव भालेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे
यासंदर्भात घनसावंगी चे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पारडगाव येथे महाराष्ट्रातला सर्वात प्रसिद्ध असा बैल बाजार भरत असतो त्यामुळे या बाजारात दूरवरून शेतकरी आणि व्यापारी जनावरे खरेदी करण्यासाठी येत असतात परंतु पार डगाव येथे आठवडी बाजाराला अतिक्रमणाचा विळखा झाला असून येथील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि व्यापाऱ्यांना त्या प्रमाणात त्रास होत असून प्रशासनाने तात्काळ अतिक्रमण हटवावे नसता पार डगाव येथील नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवाजी भालेकर यांनी दिला आहे.