शेतकऱ्याची मुलगी कु.मिनल राजू गावंडे यांची सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता ग्रेट-बी या पदावर उंच भरारी राज्यभरातून कौतुक
प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील कु.मिनल राजीव गावंडे यांची एमपीएससी 2019 परीक्षा सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता ग्रेट-बी या पदावर निवड झाली आहे. ह्या वडगाव येथील असून गावामध्ये शाळा नसल्यामुळे यांचे शिक्षण धामणगाव रेल्वे येथे झाले प्राथमिक शिक्षण श्रीमती हरीबाई भागचंद्रजी विद्यालय धामणगाव रेल्वे येथे झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय धारे येथे झाले.
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्रो.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च बडनेरा अमरावती येथून केली. (College topper gold medalist 2019) मध्ये पहिल्याच प्रयत्नात सार्वजनिक बांधकाम विभाग या मध्ये सहाय्यक अभियंता ग्रेट- b म्हणून निवड झाली.
मी माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील माझे भाऊ यांना देते कारण शेतामध्ये काम करून त्यांनी मला शिक्षणासाठी पैसे पुरवले माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे हे सर्व जे उभे राहिले आहे ते माझे वडील व माझे भाऊ माझे यांच्यामुळे झाले आहे.
माझे बहिण व भाऊ मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले आहे व माझी बहीण ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून केली माझे वडील शेतकरी आहेत व माझी आई शेतकरी आहे. तुमचं ध्येय निश्चित असेल तर तुम्हाला कोणीही ते मिळवण्यापासून थांबू शकत नाहीत असे मिनल राजू गावडे यांनी म्हटले आहे.
या सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता ग्रेड-b या निवडीबद्दल माननीय प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती-धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांना ही माहिती मिळतात मिनल ताईंशी संपर्क साधुन म्हटले की, आपण अहोरात्र अभ्यास करून या पदाचे शिखर गाठले व आपले आई-वडील शेतकरी कष्टकरी यांचे स्वप्न साकार केले त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो व एक शेतकऱ्यांची मुलगी असून सुद्धा आपण उंच भरारी घेण्याची जिद्द चिकाटी करून रात्रभर अभ्यास केला यातून नक्कीच या समाजामध्ये तुमच्या सारख्या मुली तुमच्यासारखे मुले तुमचा आदर्श घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.
नक्कीच या समाजामध्ये शिक्षणाचे झरे वाहतील व या समाजामधील मुले-मुली मोठ्या पदावर जाण्याचे स्वप्न पाहतील मी माझ्या कुटुंबाच्या वतीने ,धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपल्या निवडीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देतो. ताईंच्या निवडीबद्दल राज्यभरातून तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.