टेम्पो - हायवाची जोरदार धडकतळणी- लोणार मार्गावर अपघात : टेम्पोतील चालकाचा मृत्यू
तळणि प्रतीनीधी रवि पाटील तळणीकर
तळणी : टेम्पो- हायवाची समोरासमोर जोरदार धडक होऊन टेम्पोच्या चालकांचा मृत्यू तर हायवातील चालक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री ११ वा. तळणी - लोणार मार्गावरील वडगांव सरहद्द पाटीजवळ घडला. सचिन खंदारे कानडी
नवनाथा कोकाटे
लोणारकडे जाणा-या हायवा क्र . एम एच २१ बी यु ८८५५ व तळणीकडे येणाऱ्या टेम्पो क्र. एम एच ३७ बी १७२४ यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात टेम्पो चालक सचिन विष्णू खंदारे ( २२ वर्ष ) रा. कानडी, ता. मंठा यांच्या मृत्यू झाला. तर हायवातील चालक जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच तळणी चौकीचे पोलीस नाईक रखमाजी मुंडे व पोलीस कॉन्स्टेबल जी एस कातकडे महसूलचे तलाठी नितीन चिंचोले यांनी घटनास्थळावर भेट देऊन जखमींना उपचारासाठी हलवले तर मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
वाळू वाहतुकीचा दुसरा बळी ...
गेल्या चार दिवसातील हा दुसरा अपघाती बळी असून दहीफळ खंदारे येथील नवनाथ कोकाटे या विस वर्षीय तरुणाचा सुध्दा उपचारादरम्यान मूत्यू झाला मागच्या महीन्यात जास्त मागणी नसल्याने शेगाव पंढरपूर रस्त्यावर वाळूची वाहतूक कमी प्रमाणात होती पावसाळ्याचे दीवस जवळ येत असल्याने विदर्भात वाळूच्या मागणीने जोर वाढला असल्याने दिलेल्या मुदतीत आँर्डर पूर्ण करण्याच्या जीवघेण्या चढाओढीमुळे अपघाती मुत्यूला सामोरे जावे लागत आहे
पूर्णा नदीपात्रातून रात्रीच्यावेळी काही ठिकाणावरून अवैध वाळू वाहतूक सुरू असून यावर महसूल व पोलीस प्रशासन गप्प का असा प्रश्न समोर येत आहे रविवारी दुपारी टेम्पो- दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमीं झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री टेम्पो- हायवा अपघातात एकाचा मृत्यू झाला . अवैध वाळू वाहतुकीकडे मंठा महसूल व पोलीसांच्या 'अर्थपुर्ण' दुर्लक्षामुळे एका आठवड्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले . व्होहरलोड वाळू वाहतूकविरुध्द प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेच आहे तळणी बस स्टॅन्ड परीस सरात नेहमी वर्दळ असतो या ठिकाणी सुसाट वाळू वाहतूकीला शिस्त लावणार कधी ? रात्रीच्यावेळी अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन किती लोकांचा बळी घेणार ? असेही प्रश्न उपस्थित होत आहे.