डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शालेय वाटप
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
तालुक्यातील दैठणा खू येथील जिल्हा परिषद शाळेत तक्षशीला बहुउदेशीय सेवाभावी संस्थाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी महामानव भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय सवने, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सोनाजी गाडेकर, तक्षशिला बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष कैलास भदर्गे, समता बांधकाम पर्यवेक्षक महाविद्यालयाचे प्राचार्य विशाखा भदर्गे हे होते. विद्यार्थ्यांने डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली.
याप्रसंगी तक्षशिला बहुउदेशीय संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व बिस्कीट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य ब्रम्हंनंद तायडे, अतिष गाडेकर, शिक्षणप्रेमी दत्ता सवने, दौलत सवने, अलका दवंडे, व मुख्याध्यापक एस बी भापकर, शिक्षक एच. ए कायमखानी, ए. के. माने, पी. डी. जोगदंड, ए. के. चौधरी, बि. के कराड, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.