नशा मुक्तीचे उपचार करूनही नशा मुक्त होईना,रुग्णालयावर कारवाई करण्याची रुग्णाच्या कुटुंबियांची मागणी

  *परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे -
दारूच्या नशेच्या आहारी गेलेले त्यातून बाहेर पडत नसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला समाजात मिळत आहेत. दारू पिण्याची सवयी असलेल्या घरातील व्यक्तिला अनेक वेळा समज देऊनही दारू सुटत नसल्याने उपचारा मार्ग अवलंबला मात्र लाखो रुपये खर्च करूनही हाती निराशा पडल्याने नाशिक येथील नेर्लिकर रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी परतूर येथील महिलांनी नाशिक येथील महानगर पालिका आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.      
 या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाशिक शहरातील नेर्लीकर हॉस्पिटल मध्ये नशामुक्त करण्यासाठी पूर्ण खात्री देऊन गेल्या एक दीड वर्षापूर्वी उपचार केले. त्यांनंतर नियमित औषध गोळ्या घेतल्या. उपचारासाठी लागणार्‍या खर्च करण्यासाठी घराची परिस्थिति हालाखीची असल्याने व्याजाने, दाग दागिने, शेती विकून उपचासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र नशामुक्तीचे उपचार करूनही दारूची सवयी सुटली नसल्याने नियमित दारू पित असल्याने नातेवाईक हे डॉक्टरांना चौकशी करण्यासाठी गेले असता नशामुक्त करण्याची हमी देत नसल्याचे उत्तर देऊन तुम्हाला काय करायचे तर करा आम्ही आरोग्य अधिकारी यांना हाताशी धरून काम करतो आमचे कोणी काही करू शकत नाही. असे म्हणून सांगून उडवाउडवी केली. यामुळे नातेवाईक हादरून गेले. उपचासाठी केलेला लाखो रुपये खर्च वायफळ गेल्याने दारू सुटली नसल्याने कुटुंब हताश झाले आहे. हाती निराशा पडल्याने सबंधित रुग्णालयाने नशामुक्तिच्या नावाखाली पैसे उकळून फसवणूक केल्याची तक्रार नाशिक शहर महानगर पालिकाचे आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक नाशिक, पोलिस ठाणे नाशिक गांगपूर रोडकडे यांच्याकडे तक्रार करून रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.
 

याबाबत नेर्लीकर रुग्णालयातील डॉक्टर यांना प्रतिक्रिया देण्यास विचारले असता वरिष्ठ डॉक्टरांना भेटण्यास सांगीतले. वरिष्ठ डॉक्टर यांची येण्यास काही वेळ वाट लागेल सांगण्यात आले. मात्र काही वेळाने पुन्हा रुग्णालयाशी भेट दिली असता डॉक्टर रुग्णालयात आले नसल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातून दोन्ही डॉक्टर गायब झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.


परतूर तालुक्यात अनेक जणांनी नाशिक येथे दारू सोडण्यासाठी उपचार केले. उपचार करून आल्यावर अनेकांनी काही महीने दारू सोडली मात्र उपचार करतांना कायमची दारू सुटेल असे सांगितले असतांना मात्र अनेकांना पुन्हा दारूचे व्यसन जडल्याने खर्च करून पैसे वायफळ गेल्याने अनेकांचे संसार दारू पायी उद्ध्वस्त झाले आहे
  

राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असतांना यांच्या जिल्हातील रुग्णाच्या नातेवाइकांनी नाशिक येथील हॉस्पिटलने नसामुक्त करण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याची तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली असताना यावर रुग्णालयावर काय कारवाई होते लक्ष लागले आहे.
 

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले