३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी करा- प्रकाश सोनसळे धनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य

प्रतीनिधी हनुमंत दंवडे
 आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा मा प्रकाश  सोनसळे यांनी अनेक दिवसांपासून आयोजन करत आहेत.
    आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन मा.ज्ञानेश्वर गाडेकर सर व सुंदरराव काकडे मंडलाधिकारी हस्ते करण्यात आले.
 राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा.महादेव हजारे ग्रामसेवक यांच्या हस्ते करण्यात आले. तर राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन गणेश सानप, बनसोडे  यांच्या हस्ते करण्यात आले.
   यावेळी बोलताना प्रकाश  सोनसळे यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद ,महानगरपालिका,व शासकीय कार्यालये या ठिकाणी जयंती साजरी करण्यात यावी असे बोलताना सांगितले.
  यावेळी शितल मतकर,पवन गावडे, विशाल प्रभाळे, सुधाकर वैद्य, सुभाष महानोर,कसपटे भैय्या,प्रभाळे भैय्या,वैध भैय्या, आदी समाज बांधव उपस्थित होते.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले