हा तर राज्य सरकारचा नैतिक पराभव- आमदार बबनराव लोणीकर,सर्वसामान्यांच्या भावनांचा अनादर करीत सत्तेत बसलेल्यांना राज्यसभा निवडणुकीच्या निकालामुळे , पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष नीतीचा हा विजय- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

प्रतिनिधी हनुमंत दंवडे
राज्यसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा जनतेने दिलेला जनादेश झुगारून सत्तेत बसलेल्या आघाडी सरकारला बसलेला हादरा असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष नीतीचा हा विजय असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले आहे
विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना बबनराव लोणीकर म्हणाले की काय राज्यातील आघाडी सरकारचा हा खऱ्या अर्थाने नैतिक पराभव असून जनतेचा विश्वास घात करून सत्तेत बसलेल्या आघाडी सरकारला सरकार मध्ये असलेले घटक ही सांभाळता आली नाहीत खऱ्या अर्थाने राज्यसभेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा झालेला विजय हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा हा विजय असून, आजही अनेक आमदारांच्या मनामध्ये सत्ताधारी आघाडीच्या अनैतिकतेची सल असून त्याचाच परिणाम म्हणून राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टी ने उभे केलेले तिन्ही उमेदवार दणदणीत विजय झाले असल्याचे आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे
======================
 *देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष नीतीचा विजय*
=======================
सर्वसामान्य जनतेच्या भावना आजही भारतीय जनता पार्टी सोबत मोठ्या प्रमाणात असून शिवसेनेने केलेली गद्दारी चा सर्वसामान्य जनतेच्या मनात सल असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या विव्ह रचनेमुळेच हा दणदणीत विजय संपादन करता आल्या असल्याची भावना यावेळी त्यांनी बोलून दाखवली
पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की सत्ताधारी आघाडीतील अनेक आमदारांच्या मनामध्ये सत्ताधारी आघाडीच्या अनैतिक सत्तेची खंत असून ही ही खदखद राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून बघावयाला मिळाली असल्याचे आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे
विजय झालेले उमेदवार न् अनिल बोंडे पियुष गोयल धनंजय महाडिक यांचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अभिनंदन केले आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड