सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

राज ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त ५४ रक्त दात्यांनी रक्त दान केले- मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके

परतुर प्रतीनीधी हनुमंत दंवडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त,मराठवाडा संपर्क,मनसे नेते दिलीप  धोत्रे, प्रकाश  महाजन,संतोष  नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली, लोकमान्य रक्तपेढी संभाजीनगर, मार्फत आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना ५४ रक्तदात्यांनी रक्तदान राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवुन रक्तदान केले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिबिराचे आयोजन केले 
       या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटक एम.डी. खालापुरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष.डॉक्टर आकात, डॉक्टर नवल ,डॉक्टर तापडीया,डॉक्टर कराड ,डॉक्टर कदम,डॉक्टर भापकर,डॉक्टर सोळंके,डॉक्टर उढान, उपस्थित होते, मनसे अध्यक्ष जालना प्रकाश सोळंके,यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना लोकमान्य ब्लड बँक संभाजीनगर रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन मनसेच्या वतीने पुष्पहार घालून वृक्ष देऊन स्वागत केले 
            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाध्यक्ष राम नवल, परतुर तालुका अध्यक्ष कृष्णा सोळंके तालुका अध्यक्ष गणेश बोराडे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर केवारे, शहराध्यक्ष सोपान गोरे,सवाई राम राठोड रंजीत आडे अर्जुन मोहिते भारत शेळके अमित सरकटे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष तुकाराम कदम, मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत