पोलिस हेड कॉन्स्टेबल रविंद्र गायकवाड सेवानिवृत*
परतूर प्रतिनिधी हनुमंत दंवडे
येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल रविंद्र निवृत्ती गायकवाड हे दि ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत झाले या बद्दल त्यांचा उपविभागीय पोलिस अधिकारी आर डी मोरे, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला.
यावेळी परतूर पोलिस ठाण्यात एका सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दि ३१ मे रोजी करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे, उपनिरीक्षक नितिन गट्टुवार, पोलिस कर्मचारी गजानन राठोड, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, अशोक गाढवे, संजय वैद्य, भागवत खाडे, नितिन बोंडारे, सुनील होंडे, माने, राम हाडे, दशरथ गोपानवाड, शाम पाढरपोटे, आबासाहेब बनसोडे, वाघ, संगीता मांडे, यांच्यासह आदि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.