सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मंठा येथील कन्या शाळेत वाटप न झालेल्या शालेय पोषण आहाराची चौकशी करा...गट शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पालकांची मागणी



मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
 दि.22 शहरातील कें. प्रा.कन्या शाळेत मागील वर्षी म्हणजेच वर्षा आखेरीस शालेय पोषण आहार शासनाकडुन पाठवण्यात आलं होत.कोरोणाच्या काळापासुन शाळेत खीचडी न करता कोणतेही अन्न न शिजवता ते तसेच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.
       पण मंठा येथील कन्या शाळेत मागील वर्षी शाळेत आलेल शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल नाही. काही पालकांनी शाळेत जावुन शालेय पोषण आहाराची मागणी ही केली कारण ईतर शाळांनी आलेल धान्य त्याच वेळेत विद्यार्थ्यांना वाटप केल पण कन्या शाळेत धान्याची वाटप का?करत नाहीत असे पालकांनी विचारल पण कन्या शाळेतील प्राध्यापक ए टी चव्हाण यांनी कोणाचाही ऐकल नाही आणी वर्ष आखेरीस आलेल शालेय पोषण आहार वाटप केल नाही आणी आता जे विद्यार्थी शाळेतुन टी सी घेवुन बाहेर गावी जात आहेत ते का फक्त धान्यासाठिच शाळेत येवु शकत नाहीत मग ते त्या धान्यापासुन वंचीत राहत नाही का?आणी वर्ष आखेरीस आलेल शालेय पोषण आहार शाळेतच आहे म्हणता आहे की ते परस्पर काळ्याबाजारात विक्री केल गेल माहीत नाही कारण नविन वर्ष सुरू होताच पुन्हा शाळेला शालेय पोषण आहार उपलब्ध झाल मग कोणत वाटता हे कस कळणार कारण शाळा चालु होवुन आठवडा झाला पण आजुन एक ही दिवस शाळेत खीचडी शिजली नाही आणी ईतर शाळांनी शाळा सुरू होताच खीचडी शिजवण्यास सुरूवात केली.सांगायच म्हणजे मागच्या वर्षीच धान्य त्याच वर्षी वाटप करणे अनिवार्य असते मग ते धान्य का?वाटप करण्यात आले नाही याची सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी गट शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.गट शिक्षण अधिकारी हे दौऱ्यावर असल्याने गट समन्वयक के जी राठोड यांनी निवेदन स्वीकारल.


शाळा चालु झाल्यापासुन आजपर्यंत एक दिवशी शाळेत खीचडी शिजली नाही.मुलांना खावु दिले गेले नाही असे माझी मुल सांगत होती.पण ईतर शाळांनी शाळा सुरू होताच खीचडी शिजवण्यास सुरूवात केली:-सय्यद अल्ताफ पालक

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत