निधी उपलब्ध असताना विरोधी पक्ष नेत्यांना जालन्यात येऊन जल आक्रोश मोर्चा काढावा लागणे दुर्देवी- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी, न.प. मुख्याधिकाऱ्यांसह ऊर्जा विभागाला धरले धारेवर,विजेच्या प्रश्नावरून लोणीकर आक्रमक, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि ऊर्जा विभागाचा भोंगळ कारभार म्हणत मोबाईलच्या प्रकाशात घ्यावी लागली जिल्हा नियोजन बैठक,मी मागासवर्गीय आमदार असल्यामुळे माझ्या मतदारसंघावर अन्याय - आमदार नारायण कुचे यांचा आरोप

जालना प्रतिनिधी समाधान खरात 
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर मागील पंचवार्षिक मध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जालना नगरपालिकेला 129 कोटी रुपयांचा भरीव निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला होता त्यामध्ये आठ मोठे जलकुंभ पाण्याच्या टाक्या आणि वॉर्डनिहाय पाईपलाईन करण्यात येणार होती परंतु या योजनेला पूर्ण करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी असताना आठ वर्ष उलटून गेले तरी देखील जालना नगरपालिका हा निधी खर्च करण्यामध्ये अपयशी ठरली असून निधी उपलब्ध असताना का खर्च केला जात नाही असा सवाल उपस्थित करत जालना नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी 129 कोटी रुपये मंजूर असताना विरोधी पक्षाने त्याला जालना शहरात येऊन ज्याला आक्रोश मोर्चा काढावा लागतो ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे देखील लोणीकर यावेळी म्हणाले
जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी यांना धारेवर धरत जालना शहरातील पाणीपुरवठा योजना आणि विजेच्या प्रश्नावर जाब विचारला जालना शहराच्या पाणी पुरवठा योजनेबाबत पालकमंत्री असताना लोणीकर यांनी दर तीन महिन्याला वारंवार आढावा घेतला असून मागील अडीच वर्षात जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना जालना शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी बैठक घेणे असते वेळ मिळाला नाही ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे लोणीकर यांनी बैठकीदरम्यान नमूद केले आंधळं दळत आणि कुत्र पीठ खातं अशी जालना नगरपालिकेची अवस्था झाली असल्याचा घणाघात देखील माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन बैठकी दरम्यान केला

जालनातील जिल्हाधिकारी कार्यालयात अंधारात आज जिल्हा नियोजन बैठक पार पडली त्यावरून जिल्हाधिकारी आणि ऊर्जा विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांना धारेवर धरत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी खडे बोल सुनावले जालना तालुक्यातील पिंपळवाडी सोनदेव पाष्टा एरंडवडगाव सेवली खांबेवाडी नागापूर पाथरूड उखळी शिवनगर दरेगाव कोळवाडी वरखेड यासह आणखी काही गावांमध्ये मागील वीस ते बावीस दिवसांपासून अंधार असून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावयाच्या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असताना कोणतेही काम करण्यात आले नाही त्याचप्रमाणे श्रीष्टी तालुका परतुर येथील ते तीस केवी उपकेंद्रांमध्ये दोन ट्रान्सफार्मर होते त्यातील दोन वर्षापासून एक ट्रान्सफर वर नादुरुस्त आहे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आदेशित केलेले असताना देखील अद्याप पर्यंत दुसरे ट्रांसफार्मर बसवण्यात आलेले नाही ही बाब अत्यंत गंभीर असून ज्या कंत्राटदाराकडे हे प्रलंबित काम आहे त्यात कंत्राटदाराला काळ या यादीत टाका अशी मागणी करत हा विजेचा प्रश्न तात्काळ न सोडवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पालकमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी यांच्या समक्ष संबंधित अधिकाऱ्यांना दिला

* जिल्हाधिकारी आणि ऊर्जा विभागाचा भोंगळ कारभार*
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठक पार पडली या बैठकी दरम्यान पालकमंत्री राजेश टोपे उपस्थित असताना जिल्हाधिकारी आणि ऊर्जा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला असून आज एवढी महत्वाची बैठक चक्क अंधारात घ्यावी लागली शेवटी नाईलाजाने मोबाईलच्या उजेडात ही बैठक पार पडली यावरून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह ऊर्जा विभागाला धारेवर धरत जाब विचारला संपूर्ण यंत्रणा हाताशी असताना विज जाणार आहे असे गृहीत धरून जनरेटर किंवा इतर तत्सम व्यवस्था का करण्यात आली नाही असा सवाल देखील यावेळी लोणीकर यांनी उपस्थित केला

*मी मागासवर्गीय आमदार असल्यामुळे माझ्या मतदारसंघावर अन्याय - आमदार नारायण कुचे यांचा आरोप*
बदनापूर विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव असल्यामुळे माझ्या मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून उप अभियंता किंवा शाखा अभियंता दर्जाचे अधिकारी देखील माझ्या मतदारसंघातील विविध विभागांमध्ये नाहीत त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून माझ्या मतदारसंघातील 20 ते 22 गावे मागील दोन महिन्यापासून अंधारात आहेत वारंवार प्रशासनाला फोन द्वारे कळवून देखील प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही अशी खंत बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केले. बदनापूर विधानसभा मतदारसंघावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत नारायण कुचे यांनी जिल्हा नियोजन बैठक उधळून लावण्याचा देखील प्रयत्न केला

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश