सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जालना जिल्ह्यात शिक्षणाचा बाजार थांबवा... मनसे विद्यार्थी सेनेची तक्रार



जालना प्रतीनीधी समाधान खरात
 जालना जिल्ह्यातील शिक्षणाचा बाजार थांबवुन विद्यार्थी व पालक यांची अर्थिक लुट होत आसल्याच्या तक्रार चौफुली येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संपर्क कार्यालयात आल्या आसता या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी जालना जिल्हा परीषदचे माध्यमिक शिक्षण विभाग गाठत जिल्हा शिक्षण अधिकारी सौ.मंगल गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आसुन
      यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या तक्रारीने जिल्हा शिक्षण अधिकारी सौ .मंगल गायकवाड यांना जाग येत आपल्याकडे सबंधीत काॅलेज महाविद्यालय, क्लासेस यांची लेखी तक्रार आल्यास आपण कार्यवाही  करु आसे आश्वासन दिल्याने जालना जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांना पुढील शिक्षणासाठी काही आडचणी असल्यास सबंधित शाळा काॅलेज महाविद्यालय व क्लासेस यांचे तक्रार 9764462282 या Whatsup क्रमांकावर पाठवावी आसे अहवान मनविसेचे सिध्देश्वर काकडे यांनी केले आहे. तसेच जालना जिल्ह्यातील खाजगी ईंग्रजी शाळा यांची मग्रुरी थांबवुन जालना जिल्ह्यातील शिक्षणाचा बाजार थांबवुन विद्यार्थी व पालक वर्ग यांची अर्थिक लुट थांबवावी आसी मागणीचे पत्र जालना जिल्हा शिक्षण विभागास सादर करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत