लिंगसा येथे अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर तालुक्यातील लिंगसा येथे अखंड भारताचे वैभव वाढवणाऱ्या भारतीय संस्कृतीची विचारधारा जोपासताना संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाताअहिल्याबाई होळकर यांची 297 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिमा पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला आजच्या महिलांनी व युवा तरुणांनी अहिल्याबाई होळकरांचा विचारांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे अहिल्याबाई होळकरांनी. त्याग, शौर्य ,पराक्रम, खूप महान आहे.अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा, पानपोई,बारव, यांचे बांधकाम केले. अहिल्याबाई होळकर यांचे कार्य फार महान आहे असे प्रतिपादन कु. सुनिता गायकवाड यांनी केले आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांचा त्याग, पराक्रम ,व विचार आपण आत्मसात केला पाहिजे आपण जीवन जगत असताना अहिल्याबाई होळकरांच्या जिवन चारित्र्या मधून हीच विचार प्रेरणा आपण घ्यावी .असे प्रतिपादन कु. कोमल शाहू आव्हाड यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित म्हणून रंगनाथ येवले पंचायत समिती सभापती परतुर, व रामप्रसाद थोरात उपसभापती पंचायत समिती परतूर, यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामेश्वर भले ,परमेश्वर भले ,केशव भले, बाबुरावजी गोसावी, व जय मल्हार तरुण मित्र मंडळ लिंगसा व समस्त गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कैलाश पिसाळ यांनी केले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत