सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृतिदिनानिमित्त परतूर येथे वृक्षारोपण,भाजयुमोच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन,पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड करा,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजयुमोच्या वतीने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेवरून युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते परतूर येथे वृक्षारोपण करण्यात आले
 यावेळी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले
यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर म्हणाले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन महत्त्वाचे असून शामाप्रसाद मुखर्जी यांच्या मुक्ती दिनाचे औचित्य साधून आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून आज परतूर येथे वृक्षारोपण केले असल्याचे ते म्हणाले
पुढे बोलताना ते म्हणाले की वातावरणातील अशुद्धी दूर करणे हरित महाराष्ट्राची संकल्पना अस्तित्वात आणणे या कामी युवकांनी पुढाकार घेतल्यास निश्चित पणाने आपण यशस्वी होऊ असेही यावेळी राहुल लोणीकर यांनी सांगितले
झाडे लावून ती जगवण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी असून प्रत्येकाने किमान एक झाड लावावे असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले
कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर सुधाकर बोरगुडे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संपत टकले सिद्धेश्वर सोळंके प्रफुल्ल शिंदे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघन कणसे पंचायत समिती सदस्य शिवाजी पाईकराव बाळासाहेब सोळंके युवा मोर्चा तालुका महामंत्री रवी सोळंके युवा मोर्चा तालुका सरचिटणीस बंडू मानवतकर नगरसेवक संदीप बाहेकर कृष्णा आरगडे प्रकाश चव्हाण सुभाषराव खराबे सोनू अग्रवाल ज्ञानेश्वर जईद माऊली सोळंके बालाजी सांगोळे सरपंच शेख नदीम संभाजी वारे प्रकाश वायाळ गोरख घाडगे मलिक कुरेशी मुज्जू कायमखानी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत