पैशासाठी विद्यार्थ्यांचं एडमीशन थांबवल्यास काॅलेजच्या काचा फुटणार:-सिध्देश्वर काकडे
जालना प्रतिनीधी समधान खरात
जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी काही काॅलेज डोनेशन फिससाठी व एडमीशन फीस च्या नावाखाली विद्यार्थी मित्रांसह पालकांना वेठीस धरत आसतात. शिक्षणाचा बाजार आता आपण मनसे विद्यार्थी सेना संस्थापक अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या थांबवणार आसुन ज्या काॅलेज मध्ये विद्यार्थ्यांना पैशासाठी व डोनेशन फिससाठी प्रवेश नाकारतील त्या काॅलेजच्या योग्य वेळी आपण काचाच फोडु आसा थेट ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आक्रमक नेते राज्य कार्यकारीणी सदस्य सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे.
मेडिकल काॅलेज, इंजिनिअर काॅलेज कोणतंही काॅलेज आसो त्या काॅलेजच्या काचा आपण फोडणार म्हणजे फोडणारच आसा ईशारा काॅलेज व शिक्षण विभागाला मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. कोणत्याही विद्यार्थी मित्राला एडमीशनसाठी अडचणी येत आसतील तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्यां सोबत संपर्क करावा आसे अहवान मनसे विद्यार्थी सेनेचे नेते सिध्देश्वर काकडे यांनी केले आहे.