पोलीस उपनिरीक्षक पदी केदार गरड यांची नियुक्ती झाल्याबद्दल वाढोणा येथे सत्कार..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
परतूर तालुक्यातील वाढोणा येथे केदार गरड यांची पोलीस उपनिरीक्षक(psi) पदी नियुक्ती झाल्याबद्दल एका घरगुती कार्यक्रमात त्यांचा पुष्पगुच्छ व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. केदार गरड हे मूळचे सूर्डी ता. माजलगाव जि. बीड येथे वास्तव्यास आहेत.एमपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि एमपीएससी परिक्षेमधून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी नियुक्ती झाली आहे .केदार गरड याने अत्यंत मेहनतीने व जिद्दीच्या बळावरती एमपीएससी परीक्षा मध्ये घवघवीत असे यश संपादन केले आहे. कारण की त्याने यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे कुठलाही कोचिंग क्लास न लावता स्वतःच्या मनगटाच्या बळावरती आणि बुद्धीच्या जोरावरती एमपीएससी परीक्षे मधून मी पीएसआय होणारच ही खुणगाठ मनाशी बांधलेली होती. एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असताना अनेक संकट आली त्या संकटाला मी एक चान्स मानून सामोरे गेलो असे केदार गरड याने सांगितले . माझ्या पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याची बातमी सर्वत्र पसरताच मला अनेक नातेवाईकांनी फोन करून शुभेच्छा दिल्या तसेच मित्रपरिवार यांनी माझे अभिनंदन केले आहे. असे त्यांनी सत्कार समारंभ प्रसंगी आपली भावना व्यक्त केली आहे .या सत्कार सोहळ्याला उपस्थित म्हणून. प्रा. पांडुरंग नवल, सोमेश्वर घारे, सभापती रामेश्वर तनपुरे ,नवनाथ तनपुरे, अशोकराव तनपुरे, कैलास शेळके, भिसे नाना ,सरपंच सुरेशराव शेळके ,भास्कराव तनपुरे ,गोविंद जाधव, प्रभाकर जाधव उपसरपंच शिरसगाव, विश्वंभर आबा ,आणि गावातील इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मान्यवरांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश