सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

स्व बळीराम काशिनाथ राऊत यांना आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून श्रद्धांजली,पंढरपूर दिंडीहून परतत असताना अपघाता दरम्यान झाला होता मृत्यू,द्धांजली कार्यक्रमाला राहुल लोणीकर यांची उपस्थिती,1993 पासून स्व बळीराम राऊत करायचे नित्यनियमाने पंढरीची वारी,कार सेवक म्हणून ही आमदार लोणीकर यांच्यासोबत नोंदवला होता सहभाग


प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
स्वर्गीय बळीराम काशिनाथ राऊत राहणार अंगलगाव तालुका परतुर यांचा दिनांक 13 जुलै रोजी पंढरपूर येथील वारीतून परतताना पंढरपुर येथेच अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर स्व बळीराम राऊत यांना अंगलगाव तालुका परतुर येथे आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
 माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर हे सध्या मुंबई येथे असल्यामुळे आमदार लोणीकर यांनी चिरंजीव युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांना स्वर्गीय राऊत यांचे मुळगाव अंगलगाव येथे पाठवून स्वतः भ्रमणध्वनीवरून स्वर्गीय बळीराम राऊत यांना श्रद्धांजली अर्पित केली यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की स्वर्गीय बळीरामजी 1993 पासून सदैव पंढरपूर च्या वारीचे वारकरी होते न चुकता ते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी दिंडी मधून जायचे मात्र यावर्षी दिंडीहून परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि निष्कलंक निष्पाप माझे सहकारी बळीराम राऊत यांचा अपघात होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असून मनाला बोचणारी आहे असे सांगतानाच आमदार लोणीकर म्हणाले की राम मंदिर निर्माण साठी जेव्हा कार सेवक परतुर विधानसभा मतदारसंघातून निघाले होते त्यावेळी स्वर्गीय बळीरामजी हे सुद्धा माझ्या समवेत खांद्याला खांदा लावून या लढाईमध्ये सहभागी झाली होती त्यांचा आणि माझे गेल्या कित्येक वर्षापासूनचे ऋणानुबंध होते आज ते आपल्यात नाहीत याचे अंतकरणातून दुःख असून त्यांच्या कुटुंबीयांना परमेश्वराने या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी भ्रमणध्वनीवरून आपले मत व्यक्त करताना सांगितले
यावेळी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनीही श्रद्धांजलीपर भाषण केले
श्रद्धांजली कार्यक्रमाला परमेश्वर आकात रंगनाथ रेंगे सरपंच आप्पासाहेब खंदारे शांताराम शिंदे पत्रकार पांडुरंग शिंदे एकनाथराव खंदारे भारतराव खंदारे अशोकराव खंदारे विठ्ठलराव खंदारे श्रीधर खंदारे रघुनाथराव खंदारे कैलासराव खंदारे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकऱ्यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत