देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

परतुर- प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
     परतुर शहरातील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल तर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे त्यातील वारीची ही परंपरा तसेच संत परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना समजावे व वारीचा प्रत्यक्ष अनुभव यावा आणि आपल्या देशाची संस्कृती जपावी याकरिता या दिंडी सोहळ्याचे शाळा ते शहरातील विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुले व मुली विठ्ठल रुक्मिणी महाराष्ट्रात विविध संत यांच्या वेशभूषा करून सहभागी झाले होते . दिंडीत विद्यार्थ्यांनी झेंडे, पताके हातात घेऊन विठूरायाच्या गजर करत पालखी काढली होती. सदर सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या व बेटी बचाव , बेटी पढाव ,झाडे लावा, झाडे वाचवा, पाणी हेच जीवन अशा प्रकारचे वेगवेगळे संदेश दिले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पालखीचे पूजन केले. सदरील दिंडी सोहळामध्ये शाळेचे संचालक श्री संतोष चव्हाण ,सुबोध चव्हाण, सचिन चव्हाण ,भाग्यश्री चव्हाण , सर्व शिक्षक, पालक, शहरातील नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते .सदरील सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य गजानन कास्तोडे, वंदना ककाक्रिये, मीनाक्षी शिंगारे, राखी मुंदडा, अरुणा दीक्षित, संजय कपाळे, मनीषा लहाने, नूतन नलावडे इत्यादींनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड