सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

बँकेच्या आर्थिक साहयातुन महिलांनी आर्थिक विकास साधावा स्टेट बँकेच्या वतीने २९ महिला बचत गटांना ७९ लाख रुपये कर्ज वितरण

परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे
महिलांनी मिळणार्‍या बचत गटाच्या कर्ज अर्थसाह्यतून आर्थिक नियोजन करून आपल्या कुटुंबाचा विकास साधावा असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी यांनी केले. ते स्टेट बँकेच्या वर्धापन दिनी महिला बचत गटांना पंचायत समिति कार्यालयात २९ गटांना ७९ लाख रुपये कर्ज वाटप मेळाव्या प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे कृषी अधिकारी रविंद्र डांगे, संदीप दाभाडे, भानूदास शिंदे, शेळके, ओम खरात, यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी म्हणाले महिलांनी व्यवसाय वाढीसाठी प्रशिक्षण घेऊन शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून फायदा घ्यावा. त्यासाठी बँक आर्थिक सहकार्य करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. त्यासाठी महिला बचत गटांनी आपली पत निर्माण करणे गरजेचे आहे. समूह ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या माध्यमातून वंचित महिलाना गटात सामील करून घेण्याचे आवाहन केले. महिला समुहामुळे महिलांचा समाजात आत्मविश्वास वाढतो. समूह हा संघटितपणा शिकवतो. गटांनी व्यवसाय करतांना वेगवेगळ्या व्यवसायाची निवड करून व्यवसाय वाढवून आर्थिक विकास साधावा व आर्थिक सक्षम व्हावे.  तसेच आजचा बँकेच्या डिजीटल व्यवहाराच्या काळात महिलांनी बँकेच्या ग्रीन कार्ड वापर करून वेळेचा व पेपरलेस सुविधेचा लाभ घ्यावा. असे वाहन शेवटी सावजी यांनी केले आहे.


सीबीलमुळे भावी पिढीचे कर्जाचे दारे बंद
सध्या बँककडून कोणत्याही प्रकारचा कर्ज पुरवठा करतांना सीबील विचारात घेतले जात आहे. ज्या नागरिकांचे व्यवहार चांगले असतील. किंवा ज्याची पत चांगली आहे. कुठलेही कर्ज थकलेले नाही. अश्या ग्राहकांना बँक कर्ज देते. यामध्ये कुठे सीबील खराब झाल्यास आपल्यासह भावी पिढीला कर्जाचे दारे बंद असल्याने घेतलेले कर्ज फेडावे. तसेच कुणाचे जामीनदार होतांना काळजी घ्यावी.*
         अतुल सावजी, (मुख्य शाखा व्यवस्थापक)

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत