श्री नेमिनाथ महाराज संस्थान येथे एकादशी निमित वृक्ष रोपन व फराळाचे वाटप

तळणी : प्रतिनिधी रवी पाटील 
कृष्णगंगा फार्मर प्रोडूसर कंपनी द्वारे श्री नेमिनाथ महाराज संस्थान येथे एकादशी निमित्ताने वृक्षारोपण व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी ह.भ.प. विष्णु महाराज बादाड ह भ पअर्जुन महाराज बादाड अध्यक्ष्य किशोर भाऊ खंदारे   गोविंदराव खंदारे गणेश राव कापकर प्रभूसिंग चव्हाण सरपंच बबनराव खंदारे रामप्रसाद खंदारे कृष्णा खंदारे वसंत पवार रवी खंदारे आदीची उपस्थीती होती
       यावेळी मनोगत व्यक्त करते वेळी विष्णु महाराज बादाड यानी वृक्षसंगोपणाचे फायदे उपस्थीताना पटवून दीले जास्तीत जास्त ऑक्सीजन देणारे झाडे लागल्या गेली पाहीजेत आँक्सीजनचे काय महत्व आहे हे आपण कोरोना काळात अनुभवले आले वृक्ष लागवड ही एक लोक चळवळ झाली पाहीजे फक्त फोटो काढण्यापूरतीची वृक्ष लागवड उपयोगाची नाही लावलेल्या वृक्षाचे संगोपन होने ही काळाची गरज असुन प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावृन त्याचे संगोपन करावे  असे आवाहन बादाड महाराज यांनी केले तसेच यावेळी किशोर खंदारे यानीही मनोगत व्यक्त केले वृक्षसवर्धन व त्याचे संगोपन करण्यासाठी स्पर्धा होणे गरजेचे आहे वृक्ष लागवडीचे महत्व सध्याच्या पीढीला पटवून दीले तर येणारी पीढी सुध्दा त्याचे अनुक करण करेल वृक्ष लागवडीसाठी समाजाचा आग्रह असणे सुध्दा गरजेचे असल्याचे यावेळी खंदारे यानी सांगीतले यावेळी श्री संत नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण सस्थेतील सर्व विद्यार्थ्यानी लावलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याचा सकल्प बोलवून दाखवला

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी