पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी एकत्र या........ प्रकाश सोनसळे
बीड प्रतीनीधी
आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा मा प्रकाश सोनसळे अध्यक्ष- धनगर समाज महाराष्ट्र राज्य हे अणेक दिवसांपासून आयोजन करत आहेत.
आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहारहार अर्पण करून अभिवादन माऊली मारकड, लिंबाजी महानोर, विठ्ठल शिंदे , यांच्या हस्ते करण्यात आले.
राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन अनिल शेळके ,यांच्या हस्ते करण्यात आले. तर राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी चांगण , यांच्या हस्ते करण्यात आले.
समाज बांधवांना संबोधित करताना प्रकाश सोनसळे यांनी म्हटले की अहिल्यादेवी होळकरांचे विचार व कार्याचा जागर करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र यावे.
यावेळी हनुमंत काळे कृषी अधिकारी बीड ,रवींद्र गाडेकर माजी सरपंच पारगाव , साईनाथ कैतके सरपंच धनगरवाडी, बाळासाहेब ढवळे, दत्ता किवणे, अंकुश गवळी पत्रकार,विशाल प्रभाळे,बाबर ,राजु खंडागळे,रामा लकडे,चांगण ,मारकड टेलर, काळे ,शेळके ,आदी समाज बांधव उपस्थित होते.