शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील सावंगी गंगा येथील गोदावरी नदीवरील पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे,मेघा इंजीनियरिंग कंपनीने रखडवलेल्या पुलाच्या कामासह मतदारसंघातील दिंडी मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करण्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
मेघा इंजीनियरिंग इनफ्रास्ट्रक्चर कंपनीने NH- C 548 शेगाव पंढरपूर दिंडी मार्गाचे कामाचे कंत्राट घेतलेले असून काम आता अंतिम टप्प्यात आले आहे मात्र परतूर विधानसभा मतदारसंघातील गंगा सावंगी तालुका परतुर जिल्हा जालना येथील गोदावरी नदीच्या पुलाचे काम भूसंपादनाचे कारण पुढे करत कंपनीने जाणीवपूर्वक केले नसल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून कळविले आहे
शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरून विदर्भातून सोलापूर पंढरपूर आदी भागांमध्ये मोठ्या हजारो वाहनांची नियमितपणे येजा असते मात्र सावंगी गंगा येथील गोदावरी नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे हजारो वाहनांना वेळेबरोबरच जासन तास बसून राहण्याचा मनस्ताप सहन करावा लागतो
पुढे या पत्रात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की कंपनीने काम करत असताना डबर खडी मुरूम इत्यादी बांधकामासाठी लागलेल्या कच्च्या मालाचा 54 कोटी रुपयांचा महसूल प्रशासनाला फसवण्याचे काम केले असून, प्रशासनाने कंपनीने अनामत ठेवलेल्या 200 कोटी रुपयांतून त्यांचा महसूल भरून घेत त्यांची अनामत जप्त करावी अशी मागणी ही या पत्रात केलेली आहे
पुढे या पत्रात म्हटले आहे की श्रीष्टी तालुका परतुर येथील कसुरा नदी वरील पुलाचेही काम कंपनीने केलेले नसून जुन्या पुलावरूनच प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी कसूराने दिला पूर आल्यानंतर वाहनधारकांना व प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागते गेल्या वर्षी झालेल्या पावसाळ्यात एसटी महामंडळाची एक बस या पुलावरून पाण्याच्या प्रवाहामध्ये घसरली होती. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही त्यामुळे या पुलाचे काम करणे अतिशय गरजेचे असून सदरील काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचना कंपनीला देण्यात याव्यात अशी मागणी ही या पत्रामध्ये आमदार लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे
परतुर तालुक्यातील आष्टी हे मोठे बाजारपेठेचे गाव असून या गावात ही महामार्गाचे काम अद्याप पर्यंत हाती घेण्यात आलेले आलेले नाही त्याचबरोबर अंदाजपत्रकाप्रमाणे दिंडी मार्गाच्या धुतर्फा वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे मात्र पर्यावरण संवर्धनाला हरताळ फासत अद्याप पर्यंत अशा प्रकारची कुठलीही वृक्ष लागवड दिंडी मार्गालगत करण्यात आलेली नाही असेही या पत्रामध्ये आमदार लोणीकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे
दहिफळ खंदारे तालुका मंठा व परतुर तालुक्यातील खांडवी वाडी ते दैठणा फाटा ते हातडी या रस्त्यावरून दिंडी मार्गाच्या बांधकामाच्या वेळी मेघा कंपनीचे क्षमतेपेक्षा जास्त भरून जाणाऱ्या हायवा ट्रक गेल्यामुळे वरील रस्त्याची चाळणी झाली असून ते रस्ते कंपनीने पुनश्च एकदा दुरुस्त करून देण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी पात्रात नमूद केली आहे दिंडी मार्ग निर्मितीचे वेळी लोणी खुर्द तालुका परतुर येथील शालेय इमारतीमधील एक खोली पाडण्यात आली होती ती बांधकाम करून देण्याचा वायदा करूनही अद्याप पर्यंत कंपनीने कुठल्याही प्रकारची हालचाल केलेली नाही असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे