मंठा तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्व जागा आप लढवणार - जगदीश राठोड

मंठा प्रतीनिधी सुभाष वायाळ
दि.२९ महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच जिल्ह्यातील आरक्षणाच्या सोडती [ ता.२८ ] रोजी जाहीर करण्यात आल्या असून लवकरच निवडणुकीच्या तारखा ही जाहीर होतील असे असताना या शेतकरी, वंचित,उपेक्षित समाजाचे मूलभूत प्रश्नच अजून कित्येक वर्षापासून प्रलंबित आसल्याने तांडा,वाडी वस्त्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी आम आदमी पार्टी संघटनमंत्री मराठवाडा विभाग सुग्रीव मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील होऊ घातलेल्या आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या निवडणुकांसाठी आता कंबर कसली आहे.
         या शेतकरी,वंचित,उपेक्षित, दुर्लक्षित समाजाला कोणी वाली नसल्याने यांचा फक्त मतदानासाठीच आज आजपर्यंत वापर करण्यात आलेला असून कोणत्याही प्रकारच्या मूलभूत गरजा व सुख सुविधा आजपर्यंत यांच्यापर्यंत पोहोचवल्या नसल्याने आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी गाव,तांडा वाडी,वस्तीवरील होतकरू तरुणांना निवडणुकीत उतरवून तसेच समाजातील सर्वच जाती धर्मातील समुहाला सोबत घेत समविचारी पक्ष पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मंठा तालुक्यातील सर्व जागा लढवणार असल्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला आहे.
       दिल्ली,पंजाब,या सारख्या राज्यात सत्ता संपादन केल्या नंतर आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय करिष्मा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी तालुक्यामध्ये अनेक होतकरू तरुण तयारीला लागले असल्याचे आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष जगदीश राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....