सामाजिक उपक्रमाने युवामोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस साजरा - जिल्हा सरचिटणीस संपत टकले यांच्या पुढाकाराने सामाजिक उपक्रम

परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
परतूर येथील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा  प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून जालना जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाकडुन जालना जिल्हा संघटन सरचिटणीस संपत टकले यांनी युवामोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त परतूर येथील स्नेहांकुर सामाजिक प्रकल्पा मधील अनाथ मुलांना मंगळवारी एक दिवसाचे पालकत्त्व स्वीकारून स्नेहांकुर प्रकल्प परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. तसेच वाढदिवसानिमित्त  सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    
यावेळी जिल्हा सरचिटणीस संपत टकले, भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष छत्रगुण कणसे, प्रवीण सातोनकर, रामेश्वर तनपुरे, प्रमोद राठोड, सुनील शिवनगिरीकर, नरेश कांबळे, शिवाजी पाईकराव, शामसुंदर चित्तोडा, अमोल पैठणकर, सागर राठोड, रवी मानवतकर, शुभम कटोरे, लक्ष्मण बिल्हारे, प्रदीप कातारे,  नीता कातारे यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याचे कार्यकर्त्ये उपस्थित होते.  
*फोटो ओळी.. परतूर येथे युवामोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस स्नेहांकुर सामाजिक प्रकल्पा मधील अनाथ मुलांचे पालकत्त्व स्वीकारून वृक्षारोपण करीत वाढदिवस साजरा करतांना सरचिटणीस संपत टकले, तालुकाध्यक्ष रमेश भापकर, युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष छत्रगुण कणसे, आदि*

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

तळणी : येथील कुस्ती स्पर्धला मोठा प्रतिसाद नववर्षाच्या दिवशी लाखो रुपयाची उधळण