आमदार बबनराव लोणिकर यांना मंत्री मंडळात स्थान देण्यात यावे -शुभम कठोरे
परतूर प्रतीनिधी हनुमंत दवडे
आमदर_बबनरावजी_लोणीकर_साहेब हे लहान पणा पासुनच भारतीय जनता पक्षाचे चाहते आहेत.पुर्वी कांग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नेहमी केंद्रात व राज्यात राहायची. पंरतु सत्ता असो किंवा नसो लोणीकर साहेब हे एकनिष्ठ स्व, गोपिनाथरावजी मुंडे साहेब, स्व, प्रमोदजी महाजन, साहेब यांच्या सोबत राहून परतुर मंठा मतदारसंघातील सर्व साधारण जनतेची सेवा केली, ते लोणी ग्रामपंचायत पासुन त्यांनी महाराष्ट्र राज्याची पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ही धुरा सर्व जनतेला सोबत घेऊन सांभाळली, त्यांना पद कोणतेही असो त्यांनी त्या पदाला साध्य नाही तर साधन समजल आणि त्या साधनातुन परतुर मंठा मतदारसंघाची सेवा च नाही तर परीवर्तन घडविण्याचे काम केले, मागील भाजपा व शिवसेना मंत्री मंडळात त्यांना कॅबिनेट मंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री हे पद दिले होते त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कुटुंबाला शौचालय दिले, शेतकर्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले त्यांचा कार्यकाळात महाराष्ट्राला पाण्या अभावी दुष्काळाची झळ ही देखील लागु देली नाही आता एकनाथ संभाजी शिंदे साहेब व देवेेंद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिंदे व भाजपा सरकार महाराष्ट्रात सत्ता स्थापित झालेले आहे नवीन मंत्री मंडळाची निवड होणार असून त्यामधे परतुर मंठा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांना मंत्री मंडाळात घ्यावा अशी मतदारसंघातील जनतेची नम्रतेची विनंती आहे..