सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

माय नेशन माय प्राइड लायंस क्लब ऑफ़ जालना डायमंड तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन


 जालना  सुभाष वायाळ
     १५ माय नेशन माय प्राईड लायन्स क्लब ऑफ जालना च्या वतीने स्व.अनिल जिंदल नगर परिषद प्राथमिक शाळा, संभाजी नगर जालना येथे झेंडा वाटप कार्यक्रम सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रम आयोजित करण्यात आले
    तसेच निबंध , वकृत्व , वादविवाद , रांगोळी, व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या, या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ जालना डायमंड चे अध्यक्ष दिनेश शिनगारे , विलास जगधनेे, संतोष भालेराव, गजानन गायकवाड ,राजु गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुंडलिक , शाळेचे सह शिक्षक श्रीमती सुनंदा वैष्णव , श्रीमती कंचन काळे , माधुरी भालेराव , कल्याणी नवमहालकर , शिक्षक शिवरतन डवले हे उपस्थित होते.. आयोजित केलेल्या छान स्पर्धेबद्दल लायन्स क्लब ऑफ डायमंड जालना यांचे शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुंडलिक यांनी आभार मानले.

Comments