स्वातंत्रानतंर देशाने केलेली प्रगती हाच काँग्रेसच्या सक्षमतेचा पुरावा - राजाभाऊ देशमुख ,मा.आ.सुरेश जेथलियांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आझादी गौरव पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा साधी सुई देखील आपल्याला इतर देशातुन आणावी लागत होती मात्र त्यानंतर या पंच्च्यातर वर्षात झपाटयाने झालेली देशाची प्रगती हाचं खरा कॉँग्रेसच्या सक्षमतेचा पुरावा असल्याचे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांनी केले.
मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्या प्रमुख नेतृवाखाली आयोजीत परतुर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतिने 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आझादी गौरव पदयात्रेला संबोधित करत होते.यावेळी काॅग्रेसचे प्रदेश सचिव कल्याणराव दळे,जिल्हा कार्याध्यक्ष राजेद्र राख,मा.आ. सुरेश जेथलिया,अन्वरबापु देशमुख, नितीनकुमार जेथलिया, बाबासाहेब गाडगे, इद्रजित घनवट, सतोष दिंडे, वैजनाथ बागल, लक्षमण शिंदे, एकनाथ कदम, सुरेश सवणे, आर.के.खतिब, सादेख खतिब, सुखलाल राठोड, बाबुराव हिवाळे, राजेश खंडेलवाल, राजेश भुजबळ, रहिमो कुरेशी, सिद्धार्थ बंड, सूर्यभान मोरे, अजिज सौदागर, अविनाश शहाणे, मंगेश डहाळे, दत्ता पवार, तारेख सिददीकी, मोहसिन जमिनदार, अजिम कुरेशी, पांडुरग कुरधने, पांडुरंग गाडगे, बाळासाहेब अभिंरे, सादेकभाई जाहिरदार, हाजी अहेमद खान, माउली तनपुरे, माहादेव घेबंड, गजानन ढाकणे, मंजुळदास सोंळके, विकास खुळे, प्रविण डुकरे, शाकेर मापेगावकर, बाजीराव कातारे, सचिन लिपणे, मंजू देवकर, सुमीत भडांरी, रफिक रहिमो कुरेशीसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्तीथी होती.
दिनांक 13 ऑगस्ट रोजी जेथलिया संपर्क कार्यालयासमोरून रॅलीला सुरवात झाली मोंढा भागातुन ,गाव व अंबा असा सात किलोमिटरचा पल्ला गाठत अंबा येथील बागेश्वरी मंदिराच्या प्रनांगनात सदरील रॅलीचा समोरोप झाला. हातात तिरंगा ध्वज घेत रॅलीत कार्यकर्त्यांनी भारतमातेचा जयघोष करत परिसर दणाणुन टाकला. यावेळी मोठया संखेने नागरीक व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. आपल्या मनोगतात राजेंद्र राख म्हणाले की, सात वर्ष सोडले तर देशात आजवर फक्त काँग्रेसने सत्ता गाजवली व या काळात जगाचा पाठलाग करणारी प्रगती काँग्रेसच्या कार्यकाळात घडली.आज सात वर्षा पासुन केंद्रात सत्ता भोगणारे काँग्रेसच्या त्या काळच्या नेतृत्वावर टिका करतांना दिसतात. यावेळी कल्याण दळे यांनी म्हटले की, आज जातीय व्यवस्था बिघडत चालली असुन देशात एकात्मतेचा संदेश देणाऱ्या आजच्या सत्ताधा-यांनी स्वातंत्राच्या या अमृतमोहोत्सवापासून जाती पातीचे राजकारण करणे जरी सोडुन दिले तर या देशाच्या प्रगतीचा आलेख उंचवल्या शिवाय राहणार नाही.व सत्तेसाठी शासकीय यंत्रनांचा गैरवापर थांबवले पाहिज्याचे मत त्यांनी मांडले.
यावेळी रॅलीचे आयोजक सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले की, काँग्रेस शब्द पाळणारा पक्ष असुन महाविकास अघाडीत एकत्र आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खांदयाला खांदा लावत सक्षमपणे हि अडीच वर्ष आम्ही सरकार चालवले मात्र उध्दव ठाकरे यांच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेत एकप्रकारे सत्तालोभी विचारांच्या लोकांनी आमदार फोडले हेच कारस्थान बिहारमध्येही करणार होते मात्र नितीशाकुमार यांनी त्यांचे हे डाव उधळुन टाकला. भारताला स्वातंत्र्य काँग्रेस मुळेच मिळाल्याचे त्यांनी मनोगतात म्हणाले.
सूत्रसंचालन दिपक काळदाते तर आभार बाबासाहेब गाडगे यांनी मानले.