यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा


परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे 

तालुक्यातील यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच यश इंग्लिश स्कूल सातोना येथे आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.श्री सुरेश लहाने यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयराम खंदारे यांनी केले. 
विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळून त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने महेश भाऊ सितारामजी आकात यांनी सुरू केलेल्या संकल्पनेनुसार
दरवर्षीप्रमणे याही वर्षी यश अर्बन को. ऑ.क्रे.सो.ली. परतूर यांच्या वतीने वर्ग १०वी परीक्षेत गुणवंत आलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. जि. प.प्रशाला सातोना खुर्द यथील कु शिंदे पूजा अनिल, पानझडे गीता विष्णू,प्रधान माया मनोज, आकात पूजा कृष्णा तसेच यश प्रा. व मा. विद्यालय सातोना खुर्द येथील प्रणव महादेव लाटे, अनुजा रंजीत लाटे, श्रद्धा बालासाहेब आकात, आदित्य दीपक पानशेवडीकर, वैष्णवी अशोक झोल, श्रद्धा राजेभाऊ काळे या विद्यार्थ्यांचा शाल,सन्मानचिन्ह,धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
या बरोबरच प्रशालेतील अभिनव डांगरे या विद्यार्थ्याने महेश भाऊ आकात यांचे व्यक्तीचित्र सुंदरपणे रेखाटन केले त्याबद्दल त्याचाही पालकांसह सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांची मनोगते,समूहगीते, कवायत, ट्रिब्युट टू ग्रेट इंडियन्स इव्हेंट, यशोदर्पण उद्घाटन , विविध वेशभूषेतील विद्यार्थी, प्रभात फेरी आदी कार्यक्रमांनी गावकऱ्यांची मने जिंकली.
 यावेळी डॉ.संजय लाटे, श्रीमंत टाके, मसूद भाई, गणा संपतराव आकात, संस्थेचे अध्यक्ष मा श्री बालासाहेब आकात,आकाश भैय्या आकात, मुख्याध्यापक जयराम खंदारे, प्रिन्सिपल अनिल बोराडे , शामीर शेख तसेच पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा बोराडे व बळीराम भले यांनी तर आभार अनिल सुरुंग यांनी व्यक्त केले. दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश