दैठना खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण उत्साहात

परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे
परतूर तालुक्यातील दैठना खुर्द येथे १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनानिमित्या येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावात विद्यार्थ्यांची सकाळी सात वाजता प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच शालेय समितीचे अध्यक्ष विजय सवने यांच्या हस्ते शाळेच्या मैदानात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शाळेची विद्यार्थ्यानी मयूरी अशोक पवार हीने एनएमएस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेच्या वतीने पालकासह तिचा सत्कार करण्यात आला. तर शाळा परिसरात ध्वजारोहण करण्यासाठी शालेय परिसराची सफाई करण्यात सुरेश काटकर यांनी मोलाचा वाटा उचलल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच येथील पत्रकार भारत सवने यांना पत्रकार भूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वतंत्र दीना निमित्या शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी मुख्याध्यापक श्रीराम भापकर, शिक्षक अशोक माने, प्रकाश जोगदंड, अंकुश चौधरी, बाबासाहेब कराड, अजू कायमखानी यांच्यासह पालक विद्यार्थी प्रतिष्ठित ग्रामस्थांनीची मोठ्या संख्येने ध्वजारोहणाला उपस्थिती होती.
 
फोटो ओळी.. दैठना खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी मयूरी अशोक पवार हीने एनएमएस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेच्या वतीने पालकासह तिचा सत्कार करण्यात आला

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले