चमनचा राजा मित्र मंडळ गणेशोत्सवाचे मंडप पूजन ,मंडळाकडून संस्कृतीला सदैव उजाळा-अरविंदराव चव्हाण
जालना/प्रतिनिधी समाधान खरात
- जुना जालना भागातील मानाचे गणेश मंडळ चमन चा राजा मित्र मंडळ गणेशोत्सव समितीतर्फे यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाणार असून, मंडळाच्या मंडपाचे पूजन आज शुक्रवार दि. 5 ऑगस्ट रोजी माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंडप भुमिपुजन हस्ते माजी नगरसेवक महावीर ढक्का, काँ. सगीर अहमद रजवी, प्रशांत गाढे, दत्ता आर्दड,विजय इगेवार, धैर्यशिल चव्हाण यांची उपस्थिती होती.
यावेळी अरविंदराव चव्हाण म्हणाले की, चमनचा राजा गणेश मंडळ नेहमीच धार्मिक, सांस्कृतिक, तीर्थस्थळ आदिवर आधारित देखावे सादर करून, आपल्या देशाच्या संस्कृतीचे जतन करत आहे. या मंडळाला आपले सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावर्षीही मंडळाच्या वतीने आकर्षक देखावा आणि सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष नंदु जावळे यांनी दिली. कार्यक्रमाला मंडळाचे उपाध्यक्ष रामा खांडे, सचिव अशोक पडुळ,प्रशांत म्हस्के, मंगेश चव्हाण, दादा गाढे, विक्रम आगटे, अतुल ढवळे,मंगेश देशमुख,विक्रम आगलावे, विनय देशमुख, छोटुलाल पिछाडे, दिपक देशमुख, अमोल अंभोरे, शक्तीसिंह राजपुत, योगेश गरड, कैलास जैस्वाल, अमर जाधव, शंकर घोडके,योगेश खरात आदींसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते