समर्थ रामदास स्वामींच्या जन्म गावातून चोरीस गेलेल्या ऐतिहासिक राम सीता लक्ष्मणाच्या मूर्ती चोरणारास तात्काळ अटक करा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,आमदार लोणीकर यांनी भ्रमणध्वनी वरून पोलीस निरीक्षक व मंदिराचे पुजारी धनंजय कुलकर्णी यांच्याशी संवाद साधत घटने संदर्भात पोलीस निरीक्षक यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले निर्देश


प्रतिनिधी समाधान खरात 
इ स पंधराशे साली समर्थ रामदास स्वामींच्या जांब समर्थ गावामध्ये स्थापित करण्यात आलेल्या राम सीता लक्ष्मणाच्या पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्ती दिनांक 21 ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्या या संदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्र देत या ऐतिहासिक मुर्त्यांच्या चोरी संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून संबंधित चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे       याबाबतचे अधिकृत असे की जांब समर्थ तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील मूर्ती चोरीची घटना समजताच माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलत चोरांना जेरबंद करावे असे सांगितले त्याचबरोबर मंदिराचे पुजारी धनंजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा करत घडलेल्या घटने संदर्भात इतिवृत्तांत जाणून घेतला
 समर्थ रामदास स्वामी हे अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रगण्य असलेले संत असून त्यांच्या गावातील इ स 1500 मध्ये स्थापित केलेल्या मूर्ती चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे राज्यभरातून व जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकातून संताप व्यक्त केला जात असून यासंदर्भामध्ये तात्काळ कारवाई होणे गरजेचे असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
ज्या रामदास स्वामींनी महाराष्ट्र राज्यातील गावा गावामध्ये श्री हनुमानाचे मंदिर स्थापित केले अशा महान विभूतीच्या गावातील मंदिरामध्ये असलेल्या श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती चोरी जाणे ही गोष्ट अतिशय वेदनादायक असून या घटनेमुळे सर्वत्र चोरट्यांच्या विरोधामध्ये आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.