मौजपुरी पोलीस ठाणे स्थालांतरीत होऊ देणार नाही; मौजपुरी गावातील नागरीकांचा पोलीस ठाणे स्थालांतरास प्रखर विरोध

जालना (प्रतिनिधी) समाधान खरात 
तालुक्यातील मौजपुरी पोलीस ठाणे हे मौजपुरी येथून रामनगर येथे हलविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. परंतु, सदरील पोलीस ठाणे यापुर्वी रामनगर येथे गेले होते, ते गावकर्‍यांनी लढून पुन्हा मौजपुरी येथे नेले आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी व सुखसुविधेसाठी मौजपुरी येथील पोलीस ठाणे रामनगरला घेऊन जाण्यासाठी स्थानिक नागरीकांना पुढे करुन राजकारण करीत आहेत. या राजकारणाला आम्ही हाणून पाडणार असून पोलीस ठाणे स्थालांतरीत होऊ देणार नाहीत असा निर्धार गावकर्‍यांनी केला आहे. अशी माहीती मौजुपरी येथील भागवत राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी पत्रकार परिषदेस उप सरपंच लखन डोंगरे, रघुदादा डोंगरे, बंडू डोंगरे, अच्युत मोरे यांची उपस्थिती होती.
मौजपुरी पोलीस ठाणे हे निजामकालीन असून ते ऐतिहासिक आहे. 72 खेड्यांना जोडलेले पुर्वीचे ग्रामीण पोलीस ठाणे आहे. आता या पोलीस ठाण्याला सुमारे 48 खेडे तर 18 तांडे जोडलेले आहेत. गावात 10 वी पर्यंत शाळा असून पिण्याच्या पाण्याची मुलभुत सुविधा गावात आहे. पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र कॉर्टर्स, बोअरवेल असून विद्युत पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र डीपी आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात पथदिवे, स्वच्छ परिसर आणि अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पोषक वातावरण आहे. परंतु, अनेकांना जालना शहरात रहायचे असून त्यांना मुख्यालयी थांबण्याचा कंटाळा आहे. मुख्यालयी न थांबण्याचा प्रकार हा गेल्या अनेक वर्षापासून आहे. परंतु, गावकर्‍यांच्या सहकार्याने पोलीसांना कोणताही त्रास झालेला नाही. असे असतांनाही केवळ स्वतःच्या सुविधेसाठी पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी राजकीय लोकांना हाताशी धरून पत्रव्यवहार करण्यास लावले आहेत. मौजपुरी पोलीस ठाणे हे कोणत्याही परिस्थीतीत आम्ही रामनगर येथे जाऊ देणार नाहीत. उलट मौजपुरी गावातील नागरीकांनी पोलीस प्रशानाने सुचविलेल्या सर्व सेवा आणि सुविधा ग्रामपंचायतीच्या वतीने उपलब्ध करुन देणार आहोत. 
गावात पोलीस ठाणे ज्या जागेवर आहे त्याच जागेवर पोलीसांसाठी इमारत बांधकाम करण्यास कुणाचाही विरोध नाही, जागा मालक आणि गावकरी पोलीसांच्या सुविधेसाठी मुबलक जागा आणि सुविधा उपलब्ध करुन देत आहोत तरीही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे पोलीस ठाणे हलविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. निमाज काळापासून पोलीस ठाणे ज्या जागेेत आहे. त्याची नोंद सातबाराला आहे. शिवाय गेल्या अनेक वर्षापासून रंगरंगोटीची कामे केली, इमारत दुरुस्तीचे कामे केली, कॉर्टर दुरुस्तीचे कामे केली असतांना आता नव्या पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामाला काय अडचन आहे. सध्या करोडो रुपयाचा निधी 2020 पासून आलेला असतांना आतापर्यंत गावकर्‍यांना किंवा ग्रामपंचायतीला का सांगीतला नाही? पोलीस ठाणे इमारत बांधकामास कुणीच विरोध केलेला नाही तरीही जागेचा आभाव दाखवून इमारत बांधकाम करण्यास तयार नाहीत. 
वरिष्ठ अधिकार्‍यांना खोटी माहिती देऊन आणि दिशाभुल करुन पोलीस ठाणे इतरत्र हलविण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाहीत. पोलीसांना कोणत्या मुलभुत सुविधा लागतात त्या त्यांनी लेखी स्वरुपात ग्रामपंचायतीला कळवाव्यात, त्या सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कृती आराखड्यात टाकून सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. 
शिवाय मौजपुरी ते रामनगर रोड करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असून लवकरच हे काम देखील पुर्ण केले जाणार आहे. तसेच रामगनर येथे स्वतंत्र दुरक्षेत्र निर्माण करण्यासाठी मौजपुरी गावकर्‍यांचा जाहिर पाठींबा आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड