मंठा तालुक्यातील तळणी मंडळात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान

तळणि प्रतीनीधी रवी पाटील
मंठा तालुक्यातील तळणी मंडळात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवाल दील झाला असून पंचनामे करून सरसकट मदत देण्याची मांगणी शेतकरी वर्गातून होत आहे गेल्या एक महीन्यापासून सतत सपूर्ण तळणी मंडळात पावसाचा कहर चालू असल्याने खरीप हंगामातील सोयाबीण कापूस तूर उडीद मुग बाजरी व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असुन सोयाबीण व कपाशीची वाढ होत नसून मुळा सडत असल्याने पाने पिवळी पडत आहे यावर्षी तळणी मंडळात गेल्या वर्षीच्या आलेल्या अनुभवानुसार शेतकर्यानी उडीद मुगाची मोजकीच पेरणी केली तशीच परिस्थीती ही कपाशीची सुध्दा आहे सोयाबीन च्या पेरणी क्षेञात वाढ झाली असली तरी या वर्षीचा पेरणीला झालेला विलंब व सततच्या पावसाने होत असलेले नुकसान सोयाबीणच्या उत्पादनावर नक्कीच परीणाम होणार असल्याचे विदारक चीञ सध्या तळणी मंडळात पाहावयास मिळत आहे 

हीच परीस्थीती सपूर्ण मंठा तालुक्याची असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्हाधिकार्याकडे कानडी येथील शेतकर्यानी केली आहे गेल्या वर्षी ज्या पध्दतीने परतीच्या पावसाने नुकसान आलेल्या पिकांचे केले होते ते यावेळस उत्पादन होण्याच्या आतच होत सुरवावातील पेरणीला विलंब झाल्यानंतर पिक वाढण्यासाठी आवश्यक त्या प्रकारचे वातावरण तयार झाले नाही सततच्या पावसाने स्वच्छ सुर्यप्रकाश मिळाला नसल्याने महागामोलाच्या बियाण्याची वाढ खुंटली आहे खर तर अशा कठीन परीस्थीतीत शेतकर्याना मार्गदर्शनाची नितांत गरज असताना सुध्दा कृषी विभागाकडून माञ याकडे साफ दुर्लक्ष होत आहे 

विमा कंपन्याची मनमानी धोरण 
गेल्या दोन तीन वर्षात तळणी मंडळात सर्वाधीक पीक विमा सरक्षीत करून सुद्धा मोजक्याच शेतकर्याना पिक विमा मजूर झाला या वर्षी माञ शेतकर्यानी पिक विमा भरण्यास काटकसर केली पिक विमा कंपन्याचे मनमानी धोरण व किचकट नियमावली मुळे पिक विमा धोरणा ला शेतकरी ञ स्त आहे काही शेतकर्याची पिक विमा भरण्याची ईच्छा असताना सुध्दा पीक पाहणीचे भूत शेतकर्याच्या डोक्यात घातल्याने बरेचसे शेतकरी यामुळे वंचीत राहीले आहे

तळणी कृषी मंडळात एकुण २६ गावे
भौगीलीक क्षेत्र १६२५६हेक्टर
पेरणी लायक क्षेत्र १४६६७हेक्टर
सरासरी क्षेञ१४०६७हे
 कापूस बागायत ६७हे
कापूस जिरायत ३९६०
सोयाबीण ७४२९हे
तूर१२६९हे
मुग६८९हे
उडीद ४७१
बाजरी४२हे
या पिकांची लागवड करण्यात आली असून यातील बहुंताश पीके पाण्यात आहे

सपूर्ण मंठा तालूक्यात सतत पाऊस पडत आहे अजून दोन तीन दिवस
 पावसाचे सावट राहणार आहे शासनाकडून अद्याप पर्यन्न कुठल्याही पंचनामे व पाहणी करण्याचे आदेश दिले नाही दोन दीवसात पिकांची पाहणी करण्यासाठी तळणी परीसरात 

येणार असल्याचे ता कृषी अधिकारी व्ही जी राठोड यांनी सांगीतले

गेल्या एक महिन्यापासून पडत असलेला पाऊस सोयाबीण व कापूस पिकांसाठी नुकसान करून जात आहे हे दोनही वान शेतकर्याच्या अर्थव्यवस्थेचे आधार असुन तेच गेले आहेत शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी आणखी दोन महीने पावसाळ्यांचे बाकी आहेत 

मगलसिगं चव्हाण शेतकरी तळणी

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले