पतंजली आयुर्वेद क्लिनिकचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम ! परतूरला महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
परतूर - प्रतीनीधी हनुमंत दंवडे
शहरात आरोग्य संवर्धनासह विविध उपक्रमांनी सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती वैद्य दीपक भगवानराव दिरंगे पाटील यांनी दिली.
सदर शिबीर मंगळवारी दिनांक १६ ऑगस्ट रोजी पतंजली आयुर्वेद येथे क्लिनिक जि.प.शाळेसमोर सकाळी १०ते ६ वाजे सायंकाळपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात रक्तातील हिमोग्लोबीन तपासणी मोफत करण्यात येणार आहे तसेच महिलांची पुढील आजारांची तपासणी करण्यात येणार आहे.
जुनाट ताप,सर्दी,खोकला,दमा, डोके दुखी,दमा,अंगावर सूज ,
त्वचा विकार,सौंदर्य समस्या, झुडपे दुखी, कंबर दुखी,सांधे दुखी,मणक्यात गॅप,सततचा थकवा,हाता पायाला मुंग्या येणे,वजन वाढणे,पचनाच्या तक्रारी,आम्लपित्त, पोट साफ न होणे,अनियमित पाळी,अति रक्तस्त्राव, कमी रक्तस्त्राव, पांढरा प्रदर्शन,रक्त प्रदर(लालपाणी),गाठी पडणे,पाळीत जास्त प्रमाणात पोट,कंबर दुखणे,गर्भाशय- अंडाशयाच्या गाठी,फायब्राईड (PCOD),वयात येणा-या मुलींच्या पाळीच्या समस्या,थायराईड,चिडचिड, झोप न लागणे,गरोदर स्रियांच्या समस्या,रजोगुण निवृत्तीच्या समस्या,वंध्यत्व, रक्ताल्पता(ॲनेमिया) इत्यादी. महिल्यांच्या सर्व आजारांची तपासणीत करण्यात येणार आहे.तरी माता-भगीनींनी शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डाॅ.दीपक दिरंगे पाटील यांनी केले आहे.