माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या आक्रमक भुमिकेमुळे प्रशासन खडबडुन जाग ,आ.बबनराव लोणीकर यांनी परभणी जिल्हाधिकारी कांचन गोयल यांना लेखी पत्राद्वारे केली होती विनंती, लोणीकरांच्या लेखी पत्रानंतर परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हातील सर्व तहसिदार यांना दिले तांत्काळ पंचनामे करण्याचे आदेश

प्रतिनिधी समाधान खरात
मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनाच्या वतीने मात्र अतिवृष्टी नाही या विचाराने कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्याचे टाळले होते
     परंतु मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याकारणाने मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे 50% पेक्षा अधिक नुकसान झाले आहे काल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी परभणी जिल्हाधिकारी कांचन गोयल यांना लेखी पत्र आ.लोणीकर यांनी दिले होते नंतर आरडीसी श्री वाडोदकर यांना फोनवरून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून लोणीकरांच्या सूचनेनंतर तात्काळ पंचनाम यांना सुरुवात झाली आहे..!

प्रत्यक्षात अतिवृष्टी झालेली नसेल तरीदेखील शेतकऱ्यांचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पंचनामे करण्याची तरतूद कायद्यानुसार आहे ही बाब लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचवल्यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे मागील 20 ते 22 दिवसापासून सतत मराठवाडा सह परभणी जिल्ह्यात पाऊस सुरू असून अतिवृष्टी नसली तरी देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्राद्वारे लेखी मागणी केली आहे..!!

*लोणीकरांच्या लेखी पत्रानंतर परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हातील सर्व तहसिदार यांना दिले तांत्काळ पंचनामे करण्याचे आदेश*

अतिवृष्टी किंवा सततच्या पावसामुळे किंवा कोणत्याही कारणाने 33% पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असेल तर त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत अशी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पराभणी जिल्हाधिकारी यांनी आरडीसी यांना सूचना केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाची तात्काळ बैठक घेऊन तहसीलदारांसह इतर अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या तत्पूर्वी मात्र अतिवृष्टी झालेली नाही असे गृहीत धरून पंचनामे करण्याची गरज नाही असाच समज प्रशासनाचा होता...!!

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड