खरपुडी बनते तालुक्यातील विकासाचे रोल मॉडेल, दूरदृष्टी : विविध मार्गाने ग्रामपंचायतीने खेचून आणला विकास निधी


जालना जिल्हा प्रतिनिधी समाधान खरात:
       तालुक्यातील शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खरपुडी गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सरपंच कविता अरुण गिरी यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध मार्गाने विकास कामासाठी निधी खेचून आणला आणि गावांमध्ये विकास कामाचा धडाका लावला आज गावाचा चेहरा मोहरा बदलत आहे तालुक्यातील खरपुडी हे गाव विकासाचे रोल मॉडेल बनत आहे
            जालना तालुक्यातील खरपुडी गावाच्या विकास कामासाठी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची अरुण गिरी यांनी अलीकडेच भेट घेतली जवळपास 45 लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला   मयूर फोटो
जवळपास साडेतीन हजार लोकसंख्येचे असलेले हे गाव या ठिकाणी आनंदाने असणारे विविध जाती धर्माचे लोक सातत्याने विकास कामाला सहकार्य करत असून शासन प्रशासन स्तरावरून या गावाला होणारी मदत यामुळे गावाचा कायापालट होताना दिसत आहे गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी तसेच विस्तार अधिकारी आणि  ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी आर.बी. कोथलकर उपसरपंच भरत शेजुळ तसेच माजी पंचायत समिती सभापती समाधान शेजुळ ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक या सर्वांनी सरपंच कविता अरुण  गिरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ग्रामविकासाला दिलेली साथ महत्त्वाची ठरली गावामध्ये आज घडीला समशानभूमीचे सुशोभीकरण तसेच गावामध्ये ओला कचरा सुका कचरा याचे व्यवस्थापन सर्वांना पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था गावामध्ये असलेल्या चर्च या प्रार्थनास्थळासमोर पेवर ब्लॉक बसवून वृक्षारोपणाचे काम तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण तसेच पेवर ब्लॉक बसवून हाय मॅक्स विद्युतीकरण गावातील रस्त्याचे काम ही सर्व कामे जोमाने सुरू असून अवघ्या महिनाभरामध्ये सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास अरुण गिरी यांनी दिला एवढेच नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी गुण्या गोविंदाने नांदत असलेल्या सर्व जाती धर्मातील जनतेसाठी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे विकास निधी मंजूर करून आणला अलीकडेच फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची आपण भेट घेतली असून त्यांनी गाव विकासासाठी 45  लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे यामधून आरोग्य शिक्षण तसेच महिला सक्षमीकरण गाव सुशोभीकरण यासह खरपुडी गावाला सर्व नागरी सुविधा पुरविण्याचा आटोकाट प्रयत्न असून लवकरात लवकर ही कामे पूर्ण होतील असा विश्वास अरुण गिरी यांनी व्यक्त केला तालुक्यामध्ये खरपुडी हे गाव नक्कीच विकासाचे रोल मॉडेल ठरेल हे तितकेच खरे
 

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत