वलखेड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित ग्रामविकास पॅनल सर्वाधिक मतांनी विजयी...
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर तालुक्यातील वलखेड येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्यांनी विश्वनाथ केरोबा बिल्हरे विजयी झाले आहेत. या विविध कार्यकारी सेवा सोसायटी मध्ये ग्रामविकास पॅनलचे एकूण 8 उमेदवार रिंगणात उतरले होते. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे त्यांना मिळालेली मते
बील्हारे विश्वनाथ केरबा सर्वसाधारण 107 मताधिक्यांनी विजयी झाले. ड वारे सुभाष त्रिंबक 104 मते, डवारे भागवत विश्वनाथ 83 मते, डवारे कुंडलिक बापूराव 88 मते, डवारे विठ्ठल ज्ञानोबा 75 मते, सुरुंग प्रभाकर दादाराव 88 मते, सुरुंग विश्वनाथ रामकिसन 77 मते, सुरंग सुभाष बाबासाहेब 79 आशा मताधिक्यांनी उमेदवार विजयी झाले आहेत आणि यांच्या या विजयाबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार व आभिनंदन करण्यात आले. दैनिक चकमक च्या प्रतिनिधीशी बोलताना लक्ष्मण बिल्हारे यांनी सांगितले की विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत.