लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

परतूर येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेची बैठक संपन्न..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
दिनांक 14/ 9 /2022 वार बुधवार रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे राज्य अध्यक्ष बापूराव काने महाराष्ट्र सचिव, रामदासजी खोत मराठवाडा अध्यक्ष, शिवाजीराव गाडे यांच्या आदेशाने नवनिर्वाचित जिल्हाअध्यक्ष श्री .मोहन मुंडे यांच्या नेतृत्वात प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना परतुर तालुक्यातील नवीन कार्यकारणी व तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या विषयी जिल्हाध्यक्ष श्री .मोहन मुंडे यांनी चांगले मार्गदर्शन व दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या याविषयी चर्चा करण्यात आली. शासकीय विश्रामगृह परतुर या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली असंख्य दिव्यांग बांधव या वेळी उपस्थित   
ज्ञानेश्वर आडे ,हनुमान माने, माऊली कदम ,शंकर शिरगुळे, दादाराव बकाल ,अशोक तनपुरे, बजरंग वैष्णव ,बाबजी भुंबर, जिजाभाऊ मांटे, बाळू वाघ, आसाराम आबुज ,उमेश गुंजकर, कैलास सोळंके, श्रीकांत सोळंके, शामराव सोळंके ,अंकुश जाधव, गणपतराव मोरे ,आकाश सोळंके, अर्जुनराव बिडवे ,कपाळे. गेनाजी ,
 मिंड ,निळकंठ ,नळगे ‌ ,फिरोज शेख, बद्रुद्दीन इनामदार ,व परतुर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव प्रहारसेवक या बैठकीला हजर होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत