बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार जाहीरपरतूर येथील श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकचा वाङ्मयीन उपक्रम.



मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
परतूर येथील श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकच्या वतीने यावर्षीपासून कवी बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.
      मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले कवी बी. रघुनाथ यांचे मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. जालना जिल्ह्यातील सातोना ही जन्मभूमी असलेल्या बी.रघुनाथ या महान साहित्यिकाचा स्मृतीदिन दरवर्षी राज्यातील साहित्यिकांना त्यांच्या नावे पुरस्कार देऊन साजरा करण्यात येणार आहे.  
       यावर्षी कथा, कादंबरी, कविता, वैचारिक लेखन, ललित लेखन आदी साहित्य प्रकाराचे लेखन करणाऱ्या मंठा-परतूर तालुक्यातील लेखकांना बी. रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार असून यामध्ये परतूरचे लेखक छबुराव भांडवलकर (कादंबरी, कथा), प्रा.डॉ.अशोक पाठक (कविता), प्रा.डॉ.सदाशिव कमळकर (वैचारिक लेखन), व डॉ.धोंडोपंत मानवतकर (ललितलेखन ) या साहित्यिकांना हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
      पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे असून हे पुरस्कार लवकरच एका समारंभात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, असे डॉ.दीपक भगवानराव दिरंगे यांनी श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.रघुनाथ स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात जाहीर केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात