मंठा येथील विद्युत रोहित्र जळाल्याने नवरात्र उत्सव अंधारात ,तात्काळ रोहित्र बसविण्याची संचालक वैजनाथ बोराडे यांची मागणी
मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
दि.२६ मंठा शहरातील गोडाआड गल्लीतील विद्युत रोहित्र अचानक जळाल्याने प्रभाग 12 मधील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
सध्या नवरात्र उत्सव सुरू असून या भागातील रहिवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.प्रभाग क्रमांक 12 मधील जळालेले विद्युत रोहित तात्काळ बदलून मिळावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख ए जे बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे संचालक तथा नगरसेवक वैजनाथ बोराडे यांनी केली आहे. या संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता अनिल जंगम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे यांच्यासह दिनेश जोशी,नागेश कुलकर्णी,सुखदेव बोराडे,भगवान कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.