रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेची सेवा करणार - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, समर्पण पंधरवड्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या सेवेत कायम तत्पर रहा - लोणीकरांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकाऱ्यांना आवाहन,०१ कोटी ६४ लाख ८४ हजार ५६० रु अतिवृष्टी अनुदान ४२४५ शेतकऱ्यांना वाटप यासह शेतकरी आत्महत्या व विविध धनादेशांचं लोणीकरांच्या हस्ते वाटप


मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपण सातत्याने काम करत असून पण लोकांच्या सेवेसाठी आपण कायम तत्पर असले पाहिजे सर्वसामान्य गोरगरीब दिन दलित शेतकरी कष्टकरी माता भगिनी व बांधवांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम प्रत्येकानं करावं त्याचबरोबर आपल्या परीने होईल तेवढी मदत सहकार्य या वंचित वर्गाला करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा मी स्वतः रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गोरगरीब दीन दलितांची मदत करणे दुबळ्यांची सेवा करणे यासाठी खर्च करणार आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले.
तहसील कार्यालय मंठा येथे आयोजित संजय गांधी निराधार योजनेच्या ७२९ लाभार्थ्यांना अर्थसहाय मंजुरी आदेश पत्राचा वाटप आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना दिव्यांग विधवा परित्यक्ता दुर्धर आजार ग्रस्त अशा अनेक विविध लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ दिला जातो या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील यावेळी लोणीकर यांनी केले

जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे फळपीके व शेती पिके अनुदान स्वरूपात ०१ कोटी ६४ लाख ८४ हजार ५६० रुपयाचे अनुदान माजीमंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. वितरित करण्यात आलेले हे अनुदान ४२४५ शेतकऱ्यांना दिले जाणार असून जिल्ह्याला एकूण प्राप्त झालेल्या ३ कोटी रुपयांपैकी हा निधी मंठा तालुक्यासाठी प्राप्त झाला होता

मागील सरकारच्या काळात पिक विम्याची पद्धत पूर्णपणे चुकीची होती त्यामध्ये पीक विमा कंपन्या मालक आणि सरकार मात्र चोर अशा स्वरूपाची चुकीची पद्धत होती त्यामुळे अनेकांना पिक विमा मिळाला नाही लवकरच त्या पिक विमा पद्धतीमध्ये बदल करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई तात्काळ कशी मिळवून देता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती देखील यावेळी लोणीकर यांनी दिली

यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ०२ वारसदारांना प्रत्येकी ०१ लक्ष रुपयाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले त्यामध्ये उस्वद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी हरिभाऊ सरोदे यांच्या पत्नी श्रीमती आशामती हरिभाऊ सरोदे व जाटखेडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी बबन गोपाल राठोड यांच्या पत्नी श्रीमती बेबीबाई बबन राठोड यांना प्रत्येकी एक लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच वीज पडून जखमी झालेल्या शांताबाई बाबुराव चव्हाण रा.विरगव्हाण यांना देखील ४३०० रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे की हळवडगाव येथील ओंकार सिद्धेश्वर नाईक व माळकिनी येथील ज्ञानेश्वर उद्धवराव जाधव यांना देखील वीज पडून जखमी झाल्यामुळे शासन स्तरावर प्रत्येकी चार हजार तीनशे रुपयांची मदत मंजूर करण्यात आले असल्याची माहिती यावेळी लोणीकर यांनी दिली

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा समर्पण पंधरवडा कार्यक्रमांतर्गत ज्ञानेश्वर महादेव सोळंके केदार वाकडी आकाश प्रकाश चव्हाण हिवरखेडा अमित विजय राठोड कराड सावंगी दीपक दिनकर कहाळे वझर सरकटे रोहित उमेश प्रधान टोकवाडी सक्षम सिद्धार्थ खरात पाडळी दुधा स्वरा सिद्धार्थ खरात पाडळी दुधा संतोष उत्तमराव जाधव टोकवाडी गजानन उत्तम जाधव टोकवाडी यांना जात प्रमाणपत्राचे तर शैक्षणिक शेख मंठा बाबासाहेब संपत ढाले हातवन व योगेश राजुदास चव्हाण हिवरखेडा यांना उत्पन्न प्रमाणपत्राचे वाटप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी केले यावेळी गणेशराव खवणे सतीशराव निर्वळ पंजाबराव बोराडे राजेश मोरे नागेश घारे प्रसादराव बोराडे उद्धवराव गोंडगे किशोर हनवते प्रसादराव गडदे सुभाषराव राठोड विठ्ठलराव काळे शेषनारायण दवणे राजेभाऊ खराबे बाबाजी जाधव सूर्यकांत जाधव किरण देशमुख कैलास चव्हाण शिवाजी थोरवे विठ्ठलराव कदम दत्ताराव खराबे अशोक बोराडे शरद मोरे श्रीराम खरात नवनाथ चट्टे केशवराव येउल पेशकार प्रल्हाद दवणे नायब तहसीलदार श्री शिंदे कपिल तिवारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.