सेवेच्या माध्यमातून गोरगरिबांना आधार द्या माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन ,रूरबन योजनेतील आष्टी येथील मिनी एमआयडीसी चा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निकाली काढणार





प्रतिनिधी- कैलाश चव्हाण 
गोरगरीब वंचित शोषित पीडितांची सेवा करणे हाच आमचा अजेंडा असून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, यांच्या माध्यमातून हा झेंडा देशभरात राबवण्यात येत असून गोरगरीब दलित पीडितांना विविध योजनांचा लाभ देऊन आर्थिक सक्षम करण्याची आमची भूमिका असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
ते सेवा पंधरवड्या निमित्त आयोजित आष्टी तालुका परतुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त संपन्न झालेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होती
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे माध्यमातून आपण पालकमंत्री असताना तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणला होता या पार्श्वभूमीवर परतुर मंठा तालुक्यासाठी 42 कोटी रुपयांचा निधी आत्तापर्यंत खर्च करण्यात आला असून या निधीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना शेततळे शेडनेट स्प्रिंकलर ठिबक अवजार बँकेच्या माध्यमातून ट्रॅक्टर मळणी यंत्र रोटावेटर व इतर अवजारे उपलब्ध झाली असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या वेळी बोलताना त्यांनी सांगितले.
आत्तापर्यंत परतूर साठी 27 कोटी 88 लक्ष रुपये तर मंठा तालुक्यासाठी 13 कोटी पंचांची लक्ष रुपयाचा निधी शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून खर्च करण्यात आला असून जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी परतूर मंठा विधानसभा मतदारसंघासाठी दिला गेला असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना केंद्राच्या माध्यमातून जाणीवपूर्वक सुरू करण्यात आली होती या योजनेच्या माध्यमातून मागास असलेल्या मराठवाड्यातील आणि विदर्भातील 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता त्यामध्ये आपण प्रयत्नपूर्वक जालना जिल्ह्याचा समावेश करून घेतला त्यामुळे जालना जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील 103 गावांचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेततळे शेडनेट व्हेरी अवजारे आदींसाठी मोठ्या प्रमाणात मदत मिळाली असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले
पुढे बोलताना ते म्हणाले की सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेतला असून परतुर आष्टी मंठा नेर अधिभागामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामाचा निपटारा करण्याची योजना आपण आखली असल्याची यावेळी ते म्हणाले
आरोग्य विभागामार्फत गरोदर मातांना प्रसूती काळातील बुडीत मजुरी पोटी चार हजार रुपये अनुदान तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत पाच हजार रुपयाचे अनुदान दिले जाते गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिला यांना प्रसूती कालावधीमध्ये योग्य आहार भरण पोषण मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही रक्कम दिली जात असल्याचे यावेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
मात्र को वंदना योजनेमध्ये परतूर तालुक्याने गेल्या वर्षी क्रमांक एक मिळवलेला असून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य स्त्रीशक्तीची दक्षता घेणारे आरोग्य विभागाचे डॉक्टर परतुर तालुक्यात असल्याने हे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले
 आष्टी तालुका परतुर येथे प्रस्तावित असलेल्या रुरवन योजनेतील आष्टी येथील मिनी एमआयडीसी चे उद्घाटन करण्यात आले शेतकऱ्यांच्या 30 कंपन्या ही स्थापन झाल्या मात्र केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या 18 कोटी रुपयांमधून येथील एमआयडीसी प्रकल्प कार्यान्वित करण्याचे ठरले होते मात्र केवळ एमआयडीसीसाठी असलेल्या जमिनीची रजिस्ट्री करून घेण्यासाठी तात्कालीन प्रकल्प संचालकांनी खोडा घातल्याने हे काम लांबले आजही केंद्र सरकारचे १८ कोटी रुपये उपलब्ध असून गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्यात सरकार बदल झाल्यामुळे हा प्रकल्प सुरू करण्यास अडचणी आल्या मात्र आपण जाणीवपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल असे यावेळी बोलताना ते म्हणाले हायवे ते पांडेपोखरी रस्ता या प्रकल्पांतर्गत मंजूर असून लवकरच हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निकाली काढणार असल्याचे यावेळी उपस्थित त्यांना त्यांनी आश्वासन दिले
यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मातृत्व वंदना योजनेतील लाभार्थी सत्यशीला प्रदीप डोके सविता संतोष सवणे शितल तातेराव वटाणे, पल्लवी सुनील खालापुरे भारती मुंजाभाऊ खानापुरे गोदावरी पहाडे विद्या विठ्ठल खालापुरे प्रियंका शरद शेळके राणी संजय डव्हारे सीमा बालासाहेब झरेकर मंगल संजय जोगदंड प्रतीक्षा दत्ता गायकवाड राणी वैभव खादे आदींसह लाभार्थ्यांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले
यावेळी भाजपा का अध्यक्ष रमेश भापकर सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात जि प सदस्य सुदाम प्रधान उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव तहसीलदार रूपा चित्र उपविभागीय कृषी अधिकारी श्री रोडगे युवा मोर्चा अध्यक्ष शत्रुघ्न कणसे सिद्धेश्वर सोळंके गजानन लोणीकर महादेव वाघमारे रमेश राठोड कृष्णा मोठे सिताराम राठोड सादिक जहागीरदार बबलू सातपुते मधुकर मोरे रवी सोळंके माऊली सोळंके श्री गांजाळे रामदास सोळंके बाबाराव थोरात अमोल जोशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ ठाकूर डॉ लाटे डॉ शेख रबडे डॉ प्रधान डॉ पांढरपोटे शिवाजी जाधव श्री निंबाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी महिला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड