शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसाभरपाई द्या: सिद्धेश्वर काकडे
जालना प्रतीनिधी समाधान खरात
जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. तसेच मंठा तालुक्यात खुप पाऊस झाल्याने जालना जिल्ह्यासह मंठा तळूयातील शेतकऱ्यांवर सरकारने अन्याय करू नये आशि मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा हिंदु जनजागृती समिती तथा संत ज्ञानेश्वर महाराज सार्वजनिक संस्था अध्यक्ष सिद्धेश्वर काकडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले
या निवेदनात सिद्धेश्वर काकडे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई म्हणून जाहीर करावी तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करू नये या मागणीचे पत्र उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले आहे. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन, कापुस, तूर, उडीद, मूग या पिकांचे खुप मोठे नुकसान झाले असून सरकारने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये आशि मागणी काकडे यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर खूप मोठे आर्थिक संकट उभे राहिले असल्याने आता शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची गरज असल्याचे काकडे यांनी निवेदन पत्रात म्हटले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी हे निवेदन स्वीकारण्यासाठी मंडळ अधिकारी कुलकर्णी यांना पाठवले आसता. यावेळी माजी सरपंच नारायणराव काकडे, विवेक काकडे, संभाजी काकडे, परसराम काकडे, बाबासाहेब काकडे, मारोती काकडे, आदी शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.