श्रीमती उषा चव्हाण (मगर)यांना लॉयन्स क्लब परतूर च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर येथील विनाअनुदानित आनंद प्राथमिक शाळेत मागील दहा वर्षा पासून कार्यरत असणाऱ्या शिक्षिका श्रीमती उषा चव्हाण (मगर)यांना लॉयन्स क्लब परतूर च्या वतीने दि 05 रोजी शिक्षक दिनाचे औचित साधून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
लॉयन्स क्लब चे अध्यक्ष मनोहर खालपुरे व श्रीमती डॉ खालपुरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरीण्यात आले. त्यांना पुरस्कार मिळाल्या बदल संस्थेचे अध्यक्ष एकनाथ कदम, सचिव सुंदर कदम, डॉ भानुदास कदम, मुख्याध्यापिका सत्यशीला तौर, दिलीपराव मगर यांनी त्यांचे अभिनंदन केले. फोटो ओळी -लॉयन्स क्लब च्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना शिक्षिका उषा चव्हाण.