तळणि परिसरात जोरदार पाऊस,अधीच पावसाने शेतकरी हैराण

 तळणी प्रतिनीधी रवी पाटील
रविवार रोजी तळणीसह सपूर्ण परीसराला जोरदार पावसाने झोडपून काढले चार दीवसापूर्वी पडलेल्या ढगफूटीस सदृश्य पावसाच्या तडाख्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच आज दुपारी पाच वाजे च्या सुमारास अचानक मोठ्या पावसाला सुरवात झाल्याने रस्त्यावर व्यवसाय करणार्याची फजीती झाली 
      आधी पासून तळणीसह सपूर्ण परीसरात मोठया प्रमाणाता वातावरणात उकाडा होता या खरीप हंगामात आधीच शेतकर्याचे सोयाबीन कापूस तूर मुग ऊडीद पिकांचे मोठे नुकसान झाले गेल्या चार दीवसात शेतात साचलेले पाणी काढूण देण्यात शेतकरी व्यस्त होते साचलेले पाणी कसेबसे कमी होत नाही तोच आज पावसाने पून्हा तडाखा दिल्याने शेतकरी मेटाकुटीस आला तळणी मंडळात या बर्षी सलग दोन वेळा अतिवृष्टी झाली तरी आता पर्यंत कुठला पंचनामा ना पाहणी झाली प्रशासन स्तरावर सरसकट मदतीची कुठलीच घोषणा आजपर्यन्त झाली नाही लवकरच रब्बी हंगामाची तयारी शेतकर्याना करायची आहे तरी आर्थीक नियोजन काटकसरीने करावे लागणार असुन महीन्यावर आलेल्या दीवाळी सण सुध्दा यावर्षी गोड होण्याची शक्यता दीसत नाही शासनाने व नव्याने पांलंकत्र्याची जबाबदारी घेणारे अतूल सावे मंठा परतूर मंतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर विधान परिषद सदस्य राजेश राठोड हे कधी लक्ष घालनार असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी विचारत आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत