महाराजा श्री.अग्रसेन यांची जयंती परतूर मधे उत्साहात साजरी
परतूर/प्रतिनिधी- कैलाश चव्हाण
येथे आज सोमवार दि.२६ रोजी अग्रोहा नरेश छत्रपती महाराजा श्री.अग्रसेन यांची ५१४६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी शहरातून सकाळी ८ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येऊन महाराजा श्री.अग्रसेन यांच्या प्रतिमेची रथाद्वारे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.यावेळी या मिरवणुकीत पुरुष,महिलांसह लहान मुलांची-मुलींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान मिरवणूकीनंतर मोंढा भागातील श्री.बालाजी मंदिरात यजमान अनिलकुमार बगडीया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर अग्रवाल सेवा समितीचे अध्यक्ष निखिल अग्रवाल,कार्याध्यक्ष रोशन बगडीया,अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा श्वेता कंसल,सचिव बिंदीया केजडीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात अग्रवाल महिला मंडळ यांनी जयंती निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.जयंतीनिमित्त जालना येथील डॉ.अनिता तवरावाला यांचा सामाजिक प्रबोधनावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जयंतीनिमित्त जालना येथील जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले,या शिबिरात पुरुष महिलांसह १६ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.यावेळी महाराजा श्री.अग्रसेन यांची जयंती साजरी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष निखिल अग्रवाल,उपाध्यक्ष राजेश बगडीया,सचिव श्रेणीक बगडीया,सहसचिव जगदीश अग्रवाल,कोषाध्यक्ष योगेश मोर,कार्याध्यक्ष रोशन बगडीया यांच्यासह समितीचे सदस्य अभिषेक अग्रवाल,अभिलाष केजडीवाल,निलेश बगडीया,नवीन बगडीया,महेश मोर,प्रणय मोर,सौरभ भारुका तसेच सल्लागार श्रीकिसन अग्रवाल,राजगोपाल मोर,मुकेश केजडीवाल,शांतीलाल अग्रवाल,आनंद बगडीया,दिनेश बगडीया,गोविंद मोर,अरविंद मोर,युधिष्ठिर(सोनू)अग्रवाल,अमोल अग्रवाल,सौरभ बगडीया यांनी विशेष परिश्रम घेतले.